आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा अधिकाऱ्यांतच मतभेद, पानझडेंचे निलंबन मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निलंबित शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या बचावासाठी सरसावलेल्या मनपाच्या अभियंत्यांमध्येच मतभेद झाल्याचे आज झालेल्या बैठकीत पाहायला मिळाले. सहायक नगररचना संचालक डीपी कुलकर्णी यांच्या निलंबनाच्या वेळी असा प्रयत्न का झाला नाही, असा सवाल काहींनी विचारल्याने आयुक्तांच्या विरोधात मोट बांधण्याच्या प्रयत्नाला सुरुंग लागला.
हर्सूल तलावातील गाळ काढण्याची निविदा टीव्ही संेटर ते जळगाव रोड या रस्त्याचे काम विनानिविदा देण्याच्या प्रकरणात काल मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सखाराम पानझडे यांच्या निलंबनाचे आदेश काढले. आयुक्तांखालोखाल महापालिकेत शक्तिशाली अधिकारी असलेल्या पानझडे यांचे राजकीय पाठीराखे अनेक बडे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून आयुक्तांनी सर्वांनाच दणका दिला. पानझडेंवर कारवाई झाली तर बाकीच्यांवरही कुऱ्हाड कोसळू शकते असे वातावरण करीत अधिकाऱ्यांना आयुक्तांच्या विरोधात एक करण्याचा आज प्रयत्न करण्यात आला. सुटी असतानाही सिडकोतील प्रभागाच्या कार्यालयात मनपाच्या सेवेतील अभियंत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्याला रस्ते, बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा या विभागांचे सर्व वाॅर्ड अभियंते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाच्या सेवेतील निम्म्याहून अधिक अभियंते या बैठकीला हजर होते. या बैठकीत पानझडे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यावर चर्चा झाली. त्या वेळी उपस्थितांत मतभेद झाले. काहींनी सहायक नगररचना संचालक डी. पी. कुलकर्णी यांचे निलंबन रद्द करण्यासाठी असे प्रयत्न का गेले नाहीत, असा सवाल काहींनी विचारला. त्यावर पानझडे समर्थकांकडे उत्तर नसल्याने काही काळ वादही झाला.
बातम्या आणखी आहेत...