आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोळंबा, सातारा-देवळाईतील मालमत्ता मनपा नियमित कधी करणार,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाईमनपात समाविष्ट होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी मनपाकडून विकासकामांना सुरुवात करण्यात आलेली नाही. एकीकडे मनपाने वसुलीसाठी शहरात विविध पथके स्थापन केली. मात्र सातारा-देवळाईच्या मालमत्तांची मोजणी करून त्यांना अद्यापपर्यंत कर आकारण्यात आला नाही. येथील नागरिकांना मालमत्ता नियमित करून घेण्याची घाई लागून राहिली आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकाम केलेल्या १८ जणांना शुक्रवारी मनपा प्रशासनाने नोटिसा बजावल्या.
महानगरपालिकेने शहरातील मालमत्तांसह सातारा-देवळाईतील मालमत्ता नियमित करून सर्वेक्षण करण्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या मोहिमेत समाविष्ट केले आहे. त्याचे अद्यापपर्यंत टेंडर काढण्यात आलेले नाही. दुसरीकडे, विकासकामे करण्यासाठी आमच्या वॉर्डातून करसंकलन करणे अपेक्षित असल्याने अगोदर आमच्या मालमत्तांचे नियमितीकरण करून आम्हाला कर लावावा, अशी मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. त्यानंतरही मनपाकडून मालमत्ता नियमितीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यासाठी सातारा -देवळाई विकास समितीसह नागरिकांनी आणि नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला निवेदने दिली आहेत. मात्र मनपाकडून त्यासाठी चालढकल करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत मनपा प्रशासनाकडून नियमित ठोस असे कारण देण्यात येत नाही. केवळ ज्या नागरिकांनी आमच्याकडे अर्ज केले आहेत त्यांना कर लावून दिल्याचे सांगण्यात येत आहे. कर लावून घेणाऱ्यांची संख्या केवळ १८० असून सातारा आणि देवळाई वॉर्डात अजूनही ४० हजार मालमत्तांना कर लावणे बाकी आहे. मनपाकडून येथे एप्रिल २०१६ पासून कर आकारणी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीचा बोजा पडू नये यासाठी आताच मनपाने पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीमध्ये असताना येथील जागा आणि प्लॉट एनए-४५ मधून ४७ बी आणि ४५ करण्यासाठी प्रत्येक मालमत्ताधारकांनी १४०० रुपये जमा केले होते. ही रक्कम सिडकोकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. नगर परिषद झाल्यावर ही रक्कम महसूल विभागाला देण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र त्याला दोन वर्षे होऊन गेली तरी अद्यापही येथील नागरिकांच्या मालमत्ता नियमित करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे.
नागरिकांना आस कायम आहे
-एनएसाठी पैसेभरले आहेत त्यांना अजूनही एनए पूर्ण करून मिळणार असल्याची आस लागून राहिली आहे. मात्र मनपाकडे हे वॉर्ड असल्याने नागरिक संभ्रमात आहेत.
-महेश चौधरी, नागरिक, देवळाई

-नागरिकांनी जमाकेलेल्या पैशाचे काय झाले याबाबत कोणत्याच विभागाकडून माहिती देण्यात येत नाही. यात मनपा प्रशासनाने लक्ष घालून नागरिकांना न्याय मिळून द्यावा.
-रमेश बहुले, नागरिक, सातारा
बातम्या आणखी आहेत...