आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेत ‘आऊटसोर्सिंग’द्वारे हाेणार २५० कर्मचाऱ्यांची भरती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सन१९८४. महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा अधिकारी कर्मचारी संख्या साडेचार हजार होती. गत तीन दशकांत लोकसंख्या दहापट वाढली तरी कर्मचारी संख्या तेवढीच आहे. त्यातच पालिकेत दाखल झालेल्या सातारा-देवळाई या दोन गावांसह झालर क्षेत्रातील आणखी २६ गावे पालिकेच्या हद्दीत येऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेला दहा हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरम्यान, या मेगा भरतीमुळे तरुणांना आनंद होणार असला तरी ही भरती खासगी ठेकेदारामार्फत म्हणजेच आऊटसोर्सिंगद्वारे केली जाणार आहे.
वाढती लोकसंख्या आणि विकास कामांसाठी लागणारे मनुष्यबळ याचा ताळमेळ बसत नसल्याने यापूर्वीही कर्मचारी भरतीचा विषय वेळोवेळी निघाला. परंतु ११२४ कर्मचाऱ्यांची भरती सोडली तर त्यानंतर कोणतीही मोठी भरती पालिकेत झाली नाही. आता पुढील दोन वर्षांत सुमारे दोन हजार अधिकारी कर्मचारी सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची उणीव जाणवेल. त्यामुळे भरतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. उपअभियंत्यांसह २५० कर्मचारी भरती करण्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या असून त्या उघडून पुढील १५ दिवसांत स्थायी समितीसमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवल्या जातील.हे कर्मचारी ठेकेदारामार्फत नेमलेले असतील. पालिकेचे अधिकृत अधिकारी-कर्मचारी म्हणून त्यांनी नोंद होणार असली तरी त्यांचे उत्तरदायीत्व ठेकेदाराकडे असेल. या कर्मचाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार तसेच काही गडबड केल्यास पैसे वसूल करता यावेत म्हणून संबंधित ठेकेदाराला पालिकेकडे ५० लाखांची बँक गँरंटी आधीच द्यावी लागणार आहे.
६५ जणांना कालबद्ध वेतनश्रेणी
पालिकेत कार्यरत सुमारे ६५ जणांना १२ २४ वर्षांची कालबद्ध वेतनश्रेणी मिळायला हवी. ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नाही, अशांना सेवेच्या १२ वर्षांनी कालबद्ध वाढीव वेतनश्रेणी दिली जाते. यातील काही कर्मचाऱ्यांनी केव्हाच ही सेवामर्यादा पूर्ण केली आहे. काही दिवसांपासून हा प्रस्ताव चर्चेसाठी होता. २७ सप्टेंबरला आयुक्तांनी यासाठी बैठक बोलावलीही होती. परंतु ती होऊ शकली नाही. लवकरच ही बैठक होणार असून त्यात ६५ जणांना कालबद्ध वेतनश्रेणी दिली जाईल.

पगार ३०%कमी
आऊट सोर्सिंगद्वारे कर्मचारी भरती करावी, खर्चात ३० टक्के कपात करावी, असे शासनाने आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यांचे पगार पालिका कर्मचाऱ्यांच्या ३० %कमीअसतील. म्हणजेच पालिकेच्या सेवापटावरील कर्मचाऱ्याचा पगार २० हजार तर ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार हा १४ हजार असेल.

दृष्टिक्षेपात पालिका
{ सध्याची कर्मचारी संख्या : हजार ५००
{ ३० वर्षांत वाढलेली लोकसंख्या, सातारा-देवळाईचा समावेश झाल्यानंतरची गरज - हजार कर्मचारी
{ नव्याने २६ हजार गावे समाविष्ट होत असल्याने अपेक्षित संख्या - किमान १० हजार (कर्मचाऱ्यांच्यापगारावर ३५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम खर्च होता कामा नये, असा नियम आहे. त्यामुळे भरती होत नाही.)

पुढील दोन वर्षे निवृत्तीचीच
स्थापनेनंतर पाच वर्षांत पालिकेत भरती झाली. आता ही मंडळी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. आगामी दोन वर्षांत निम्मे कर्मचारी निवृत्तीच्या मार्गावर असतील. त्यामुळे पुढील दोन वर्षे निवृत्तीची वर्षे म्हणून ओळखली जातील. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जागेवर लाड समिती तसेच अनुकंपा तत्त्वावर कर्मचारी भरले जातात. परंतु त्यावरील जागा निवृत्त झाल्यानंतर तेथे आपोआप कोणी येत नाही. परिणामी पालिकेला कर्मचारी भरती अनिवार्य आहे. ती होणार असली तरी यापुढे फक्त आऊटसोर्सिंगद्वारेच भरती केली जाईल.

.... तर वाढेल कर्मचारी संख्या
पालिकेचे अंदाजपत्रक ८०० कोटींच्या पुढे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते ४०० कोटींच्या पुढे जात नाही. यंदाच्या अंदाजपत्रकात १८६ कोटी रुपये फक्त पगारावर खर्च होणार आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायची असेल तर अंदाजपत्रकाचा आकडा वाढयला हवा.

शासन निर्णय काय म्हणतो?
शासकीय खर्चात ३० %बचतव्हावी, यासाठी गरजेनुसार कर्मचाऱ्यांची भरती करावी, तीही ठेकेदारामार्फत व्हावी. पालिका कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पगाराच्या ३० टक्के कमी पगार त्यांना देण्यात यावा. कोणत्याही क्षणी कर्मचाऱ्याला कमी करण्याचे अधिकार प्रशासनाला असावेत.
बातम्या आणखी आहेत...