आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाने केली ५१ जनावरांची सुटका, सिल्लेखान्यात, पोलिस महापालिका पथकांची संयुक्त कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अवैध कत्तलीसाठी आणलेल्या ५१ जनावरांना मनपाच्या पथकाने गुरुवारी पहाटे सिल्लेखान्यात कारवाई करीत वाचवले. या ५१ जनावरांत २७ गाई कालवडी आहेत. आजच्या या मोहिमेदरम्यान पथकावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
सिल्लेखान्यात जनावरांच्या कत्तलीला बंदी असली तरी तेथे अवैध कत्तलीसाठी बाहेरून गायी बैल आणण्यात आल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले. क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक नूर महंमद यांनी पहाटे तीन वाजेपासून सापळा रचला होता. पालिकेच्या यंत्रणेलाही पाचारण करण्यात आले. प्राणिसंग्रहालय विभागाचे प्रमुख अयुब खान, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार हेही हजर झाले. पहाटे चार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान कारवाई सुरू होती. जनावरे पालिकेचे कोंडवाडा पथकाचे प्रमुख पशुधन पर्यवेक्षक अनंत जाधव यांच्या ताब्यात देण्यात आले. कारवाई सुरू असताना पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही येथे पाहणी केली.

दोन दिवसांत गोशाळेत पाठवणार
पालिकेनेया गायींना तात्पुरते गरम पाणी परिसरातील सिद्धार्थ उद्यानाच्या मागील जनावरांच्या कोंडवाड्यात ठेवले आहे. येत्या दोन दिवसांत गायींची रवानगी गोशाळेत केली जाणार असल्याचे उपायुक्त अयुब खान यांनी सांगितले. आजच्या कारवाईत नदीम अब्बास कुरेशी, रियाज कुरेशी, अनिस हनिफ कुरेशी यांना अटक करण्यात आली. मौलाना मजीद अब्दुल करीम यांनी पोलिसांना गुंगारा देत घटनास्थळावरून पोबारा केला.
बातम्या आणखी आहेत...