आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरच्या चौकशीला कक्षा अन् मुदतही नाही, विरोधात अर्ज करणाऱ्यांशी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर जलवाहिनीच्या चौकशीला एकदाचा मुहूर्त लागला आहे. संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखालील समितीने आज आपल्या पहिल्या औरंगाबाद भेटीत समांतरबाबत आक्षेप असणाऱ्यांच्या भेटी घेत चर्चा केली, तर मनपाकडे या चौकशी समितीने निविदा, करार योजनेबाबतची सगळी कागदपत्रे मागितली आहेत.
या समितीकडून होणाऱ्या चौकशीची व्याप्ती निर्धारित केली नसल्याने सगळ्याच योजनेची चौकशी करावी लागणार असून ती पूर्ण व्हायला किती कालावधी लागेल हे सांगण्यास संतोषकुमार यांनी नकार दिला.
मार्च महिन्यात विधान परिषदेत आमदार सुभाष झांबड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या वेळी समांतर योजनेवर आक्षेप घेत या योजनेत अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा या योजनेतून सामान्य नागरिकांना त्रास होणार असल्याचा आरोप करण्यात आला होता. चर्चेदरम्यान झांबड यांनी योजनेतील त्रुटींवर बोट ठेवत आरोप केले होते. यावर उत्तरादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समांतरची सविस्तर चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आॅगस्ट रोजी नगरविकास खात्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार यांची एकसदस्यीय समिती नेमण्याची घोषणा केली.

दरम्यानच्या काळात विधानसभेत भाजपचे अतुल सावे एमआयएमचे इम्तियाज जलील या आमदारांनीही समांतरच्या विषयावर प्रश्न उपस्थित केले होते. नंतरच्या काळात संतोषकुमार यांनी या चौकशीत तांत्रिक तज्ज्ञाची आवश्यकता असल्याने एकट्याने चौकशी शक्य होणार नसल्याचे कळवले होते. त्यानुसार नंतर जीवन प्राधिकरणाचे तांत्रिक संचालक डॉ. हेमंत लांडगे, नगर परिषद प्रशासनाचे अनिल मुळे यांची नियुक्ती केली.

या त्रिसदस्यीय समितीचे गठण होऊनही चौकशीला प्रारंभ झाला नव्हता. त्यामुळे चौकशीची घोषणा नावापुरतीच आहे का, असे वातावरण तयार होत असतानाच आज या चौकशी समितीने कामाला प्रारंभ केला.

संतोषकुमार डॉ. लांडगे या समितीच्या दोन सदस्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या छावणीजवळच्या कार्यालयात कामकाजाला प्रारंभ केला. आजची ही पहिलीच बैठक असल्याने आज त्यांनी या योजनेबाबत सरकारकडे ज्यांनी तक्रारी केल्या त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सकाळी आमदार अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप राठोड यांनी भेट घेऊन आपले म्हणणे मांडले कागदपत्रेही सोपवली. नंतरच्या सत्रात या समितीने मनपा आयुक्त प्रकाश महाजन, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे उपअभियंता के. एम. फालक यांच्याकडून समांतरबाबत माहिती घेतली भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्याआक्षेपाबाबत विचारणा केली. यानंतर सायंकाळी माजी मनपा आयुक्त कृष्णा भोगे इतरांनी समिती सदस्याची भेट घेऊन आपली बाजू मांडली.

कागदपत्रे मागवली
पत्रकारांशीबोलताना संतोषकुमार म्हणाले की, आज काम सुरू झाले आहे. या चौकशीची व्याप्ती ठरवण्यात आली नसल्याने सगळ्याच योजनेची चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही मनपाकडे निविदा करारासह योजनेची कागदपत्रे मागवली आहेत. काम मोठे असल्याने चौकशी कधी पूर्ण होईल हे आताच सांगता येणे अवघड असल्याचे ते म्हणाले. भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले की, आम्ही आमच्या आक्षेपांबाबत सविस्तर माहिती कागदपत्रे सादर केली आहेत. या योजनेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना त्रास होऊ नये हीच आमची भूमिका असून तीच समितीसमोर मांडली असल्याचे ते म्हणाले.