आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

272 कोटींचा कर थकीत, मनपा प्रशासनाची कबुली, कर वाढीचा डाव उधळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकीकडे मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. दुसरीकडे करवसुली विभागाच्या अकार्यक्षतेमुळे निवासी मालमत्तांची १९४ कोटी रुपयांची तर व्यावसायित मालमत्तांची ७८ कोटी रुपयांची थकबाकी असून शहरात फक्त २५ टक्केच मालमत्ताधारक कर भरत आहेत.
करमूल्य निर्धारण व मुख्य कर वसुली अधिकारी शिवाजी झनझन यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत कबुली दिली. दरम्यान, प्रशासनाने ठेवलेला मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने साफ फेटाळून लावला.
येत्या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात २४ ते ३५ टक्के वाढ सूचवणारा प्रस्ताव प्रशासनाने आज स्थायी समितीत मांडला होता. या प्रस्तावामुळे शहरातील मालमत्ताधारकांना ३०० ते ७०० रुपयांचा भुर्दंड पडणार होता. निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय परवडणारा नसल्याने सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध केला. काशीनाथ कोकाटे, मीर हिदायत अली, त्र्यंबक तुपे आदींनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला.
७९६९ जणांनी कर भरला
सदस्यांच्या या सरबत्तीवर शिवाजी झनझन यांनी जी माहिती दीली ती प्रचंड धक्कादायक आहे. ते म्हणाले की, शहरात १९ हजार ४१५ व्यावसायिक मालमत्ता असून त्यापैकी फक्त ७९६९ मालमत्तांचाच कर भरला गेला. ही टक्केवारी ११ टक्के आहे. ७१ कोटी रुपये थकीत आहेत. निवासी मालमत्तांच्या बाबतीत तर आणखीच गंभीर स्थिती आहे. शहरात १ लाख ७३ हजार ४४३ निवासी मालमत्ता आहेत. त्यापैकी ३६ हजारांकडूनच वसुली होते. १ लाख ४५ हजार मालमत्तंधारकांकडेे १९४ कोटी ४० थकले आहेत.