आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने केली एकाच दिवसात साडेतीन कोटींची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेत सकाळी सात वाजेपासून सुरू झालेली वसुली १२.४५ वाजेपर्यंत ८० लाख रुपयांवर आली होती. दुपारी दोन वाजता एक कोटी ३७ लाख रुपये झाली होती. सहा वाजेपर्यंत दोन कोटी ७५ हजार रुपये, तर साडेसात वाजता तीन कोटी १० लाख ९५ हजार रुपये वसुली करण्यात आली होती. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा आकडा साडेतीन कोटींवर पोहोचला होता. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होती. यात ज्यांनी आतापर्यंत कर भरला नाही, अशा थकबाकीदारांसह नियमित वर्षीचा कर भरणारेही होते. साडेसात वाजता मुदतवाढ नसल्याचे सांगण्यात येत असताना त्यांच्या २० मिनिटांनंतर मात्र ७२ तासांची मुदतवाढ देण्यात आल्याचे समोर आले होते. याबाबत मनपाला काहीच आदेश नसल्याने नागरिकांसह सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
बातम्या आणखी आहेत...