आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेची वेबसाइट लवकरच नव्या रूपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुणे,मुंबई सोडा, पण नांदेडसारख्या छाेट्या मनपाच्या वेबसाइट्स अधिक नागरिकस्नेही (युजर फ्रेंडली) असताना औरंगाबाद मनपाची वेबसाइट मात्र जुन्याच प्रकारची असल्याने आॅनलाइन पेमेंट मनपाच्या सुविधा या वेबसाइटवर मिळत नाहीत. इंटरनेटचा वाढता वापर वेगवान काम व्हावे या साठी महापालिकेची वेबसाइट नव्याने तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या नवीन वेबसाइटवर आॅनलाइन करभरणा तसेच मनपामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधा एका क्लिकवर देण्याबाबत काय करता येईल याची चाचपणी सुरू आहे.

शासकीय निमशासकीय कामकाजात इंटरनेट संगणकाधारित कामकाजाला सुरुवात झाल्यावर राज्यातील महापालिकांनी आपापल्या वेबसाइट्स तयार केल्या काळानुसार आणि गरजेनुसार त्यात आधुनिकीकरण करत या वेबसाइट नागरिकांच्या जास्तीत जास्त उपयोगी पडतील अशा स्वरूपाच्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद मनपाची वेबसाइट मात्र त्या तुलनेत मैलोगणती मागे आहे. तांत्रिकदृष्ट्या प्राथमिक दर्जा असल्याने ही वेबसाइट (www.aurangabadmahapalika.org) आतापर्यंत कुचकामीच ठरली आहे. ही वेबसाइट लवकर ओपन होत नाही, त्यावर मोजकीच माहिती उपलब्ध आहे. मनपाच्या सगळ्या सेवा आॅनलाइन उपलब्ध नाहीत. परिणामी निव्वळ शोभेपुरती वेबसाइट उरली आहे. आता तरी मागील दोन महिन्यांपासून त्यावर ताजी माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महापालिकेची वेबसाइट अधिकाधिक नागरिकस्नेही करण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेडचे उदाहरण धडा देणारे
नांदेड महापालिका औरंगाबादच्या तुलनेने नवीन आहे. या मनपाने आपली वेबसाइट एवढी नागरिकस्नेही केली आहे की अनेक कामांसाठी मनपाच्या कार्यालयांचे खेटे घालण्याची गरज राहिलेली नाही. नांदेडमधील सगळ्या मालमत्तांचा डाटा आॅनलाइन उपलब्ध आहे. मालमत्ता क्रमांक टाकला की सर्व तपशील उपलब्ध होतो.

काय आहे नवीन वेबसाइटमध्ये?
{मनपाकडे नोंद असलेल्या सर्व मालमत्तांचा तपशील.
{ मालमत्ता कर, पाणीपट्टी इतर करांचा आॅनलाइन भरणा करण्याची सुविधा.
{ पालिकेच्या सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून देणे.
{ नागरिकांना हवी असणारी माहिती, फाॅर्म आॅनलाइन.
{ याशिवाय नागरिकांशी त्यांच्या हक्कांशी संबंधित बाबी.