आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी शुद्ध करण्यासाठी मनपा करणार सर्वेक्षण, सातारा, देवळाईतील विहिरींची दिवसांत सुरू करणार पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विहिरींत तुडुंब साठा असूनही पाण्यासाठी आसुसलेल्या सातारा गावातील नागरिकांची कैफियत "दिव्यमराठी’नेसमोर मांडली. ग्रामस्थांना पाच दिवसाआड तेही दूषित पाणी मिळत असल्याचेही समोर आणले. हे वृत्त प्रकाशित होताच सातारा आणि देवळाई गावात सर्वेक्षण करून विहिरींचे पाणी स्वच्छ करण्यासाठी ट्रिटमेंट प्लांट तयार करण्याच्या हालचाली मनपा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. दोन दिवसांत सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे, अशी माहितीही मनपा अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली.
समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर सातारा-देवळाई या दोन्ही नवीन वॉर्डांना पाणी देण्याचे नियोजन होते. मात्र, आता समांतरचे कामच धोक्यात आल्याने शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी समांतरच्या पाण्याची आशा सोडली आहे. गावातील आहे त्या दोन विहिरींचे पाणी पुरेसे ठरत असले तरी पाऊस आणि नदीचे पाणी थेट या विहिरीत येते. शुद्धीकरण करता हेच पाणी ग्रामस्थांना पुरवले जाते. त्यामुळे बहुतांश ग्रामस्थांना खासगी टँकर, जार अथवा मनपाकडूनच पाणी विकत घ्यावे लागत आहे. या बाबींवरही "दिव्यमराठी’नेवृत्तांद्वारे प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेऊन मनपा प्रशासनाने पाणी शुद्ध करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

मनपाच्या १२ टँकरने पाणीपुरवठा
सातारा वॉर्डातील नागरिकांना मनपाकडून १२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी नागरिकांना दरमहा ३०० रुपये मोजावे लागतात. पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. समांतरचे काम झाल्यानंतर येथे पाणी पुरवले जाणार असल्याने प्रशासनाने दुसरा विचार केला नव्हता. आता मात्र प्रशासनाला पर्याय शोधावा लागत आहे.

दोन्ही वॉर्डांत सर्वेक्षण
^सातारा-देवळाईसाठी समांतरच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यात अडचण निर्माण झाल्याने पर्याय शोधावा लागत आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत दोन्ही वॉर्डांत सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. सरताज सिंगचहल, अभियंता, पाणीपुरवठा विभाग
बातम्या आणखी आहेत...