आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकांची कामे होत नसल्याने महापौर, उपमहापौर निराश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तिजोरीत खडखडाट, विकासकामांची गाडी रुतलेली, नागरिकांची सातत्याची ओरड आणि त्यावरून महापालिकेत नगरसेवकांची ओरड अशा अवस्थेत अडकलेले महापौर त्र्यंबक तुपे हताश झाले अाहेत, तर उपमहापौर प्रमोद राठोड निराश झाले आहेत. प्रशासनाकडून काडीचेही सहकार्य नसल्याने कामेच होत नाहीत, त्यामुळे लोकांना तोंड दाखवायला जागा राहिली नसल्याची खदखद त्यांनी अनौपचारिक गप्पांत व्यक्त केली.
महानगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास दीड वर्ष होत आले आहे. सुरुवातीचे वर्ष विनाबजेटचे गेले. शिवाय तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्यासोबत संघर्षात गेले. त्यानंतर आलेल्या आयुक्त सुनील केंद्रेकरांनी कामांना कात्री लावत आर्थिक गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला, तर आताचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या काळात तरी कामे मार्गी लागतील, असे वाटत असतानाही कामेच ठप्प झाल्याने नगरसेवकांत अस्वस्थता संपून संताप उमटत आहे. महापौर त्र्यंबक तुपे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी काल अनौपचारिक गप्पांत आपली व्यथा बोलून दाखवली.

प्रशासनाला सांगून थकलो...
कामासाठी अधिकाऱ्यांशी बोलायला गेलो तर होकार कधीच मिळत नाही. नागरिकांच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांना फोन करतो तेव्हा ‘माणसे नाहीत’ हे पहिले उत्तर ठरलेले असते. पाण्यासारखा विषय नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे. पाणी आले नाही तर नागरिक नगरसेवकांना जाब विचारणारच. दूषित पाण्याच्या तक्रारी आल्या तर नगरसेवकाकडे येणारच. त्याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही कामे होत नसतील तर नैराश्यच येणार. प्रशासन नगरसेवक यांच्यात समन्वयाचे काम आम्ही पदाधिकाऱ्यांनी प्रारंभापासून केले, पण त्याला प्रशासनाकडून पाऊल उचलले जात नाही. प्रश्न सोडवण्याऐवजी तिढा वाढेल असेच प्रशासन वागत आहे. आर्थिक स्थितीचे कारण पहिल्या वर्षी होते हे मान्य; पण बजेट असताना कामे पटापट मार्गी लागली तर नगरसेवकांनाही वाॅर्डात कामे होत असल्याचे नागरिकांना सांगता येईल; पण त्यातही फाटे फुटत असतील तर नगरसेवकांना शिव्यांचेच धनी व्हावे लागेल.

आम्ही किती सहकार्य करायला हवे?
या आधीही नगरसेवक राहिलो आहे, पण अशी अवस्था नव्हती. आम्ही सगळे पदाधिकारी पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिकेनेच प्रशासनाला सहकार्य केले. कामे व्हावीत या हेतूने प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावांना सहकार्य केले. गुंठेवारी असेल की समांतर किंवा होर्डिंग... सगळ्याच विषयात आम्ही सहकार्य केले. पण तरीही कामे होत नसतील तर काय करायला हवे? महापौर म्हणून विविध ठिकाणी जावे लागते. आता तिथे लोक तोंडावर बोलतात. गप्प बसण्याखेरीज काही करता येत नाही. सोशल नेटवर्किंगवरून टीका होतेे. प्रशासन हलायलाच तयार नाही. सहकार्य करून पाहिले, टीका करून पाहिली, पण कामे होत नाहीत. लोकांना आम्हाला उत्तर द्यायचे असते. साधी रिक्षा खरेदी करण्याचे टेंडरचे काम प्रशासनाला योग्य प्रकारे मार्गी लावता आलेले नाही. दर कमी यावा म्हणून पाच वेळा टेंडर काढले. या काळात भाड्यापोटी मनपालाच भुर्दंड बसला. मी हताश झालो आहे.
बातम्या आणखी आहेत...