आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलईडी प्रकल्पाप्रकरणी आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एलईडी प्रकल्पाबाबत मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून येत्या १९ तारखेला होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्यास सांगितले आहे. तारखेला हजर राहिल्यास अटक वाॅरंट जारी केले जाईल, असेही नोटिसीत म्हटले आहे. वर्षभरापूर्वी मनपाने शहरात एलईडी पथदिव्यांची यंत्रणा बसवण्याबाबत निविदा मागवल्या होत्या. त्यात दुजाभाव झाल्याचा आरोप या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या ठेका मिळालेल्या कंपनीने केला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने मनपाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. निविदा प्रक्रिया पूर्ण करत स्थायी समितीने एका कंपनीला हे कामही दिले. आता या प्रकरणाची सुनावणी १९ जुलै रोजी होत असून न्या. दीपक मिश्रा न्या. सी. नागप्पन यांच्यासमोर हे प्रकरण आहे. या सुनावणीला हजर राहण्याची नोटीस मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना बजावली अाहे. गेल्या दोन वर्षांपासून एलईडी खरेदीचे सुमारे १०० कोटी रुपयांचे कंत्राट वादाच्या भोवऱ्या सापडले आहे. त्यामुळे एलईडीची कामे थांबली आहेत
बातम्या आणखी आहेत...