आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅरीबॅगविरोधी मोहिमेतून मनपाला मिळाले २.५ लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्या मॉल्सवर कारवाई करून मनपाने आठ दिवसांत अडीच लाख रुपये दंड वसूल केला. या कारवाईत अडीच टनांपेक्षा जास्त प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने शहरात प्लास्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी सुरू झाली होती. गेल्या आठ दिवसांत मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यात रिलायन्स मॉलमध्ये १५०० किलो कॅरीबॅग जप्त करून ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. प्रोझोन मॉलमधील स्टार बाजारमधून १८०० किलो कॅरीबॅग जप्त करून ५० हजार रुपये दंड लावला.

डी मार्टमधून ८०० किलो कॅरीबॅग जप्त करून त्यांच्याकडूनही ५० हजार रुपये दंड वसूल केला. सर्वाधिक कॅरीबॅग (अडीच टन) वॉलमार्टमधून जप्त केल्या. वॉलमार्टला एक लाख रुपये दंड केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा ठोकळ, विशाल खरात, सचिन भालेराव आदींनी केली.
बातम्या आणखी आहेत...