आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जनासाठी महापालिकेने तात्पुरत्या टाक्यांची व्यवस्था करावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील ११३ वॉर्डांमधील ८०० सार्वजनिक गणेश मंडळे आणि सुमारे सात लाख घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी केवळ आठ विहिरी उपलब्ध अाहेत. त्यामुळे अनेकांना नाइलाजाने खासगी विहिरींत किंवा तलावात विसर्जन करावे लागते. स्वत: विसर्जन करण्याची इच्छा असूनही भक्तांना यामुळेच गणेशमूर्ती मोठ्या मंडळाकडे विसर्जनासाठी सोपवाव्या लागतात.

शहर परिसरात लहान-मोठी १३०० गणेश मंडळे असल्याची नोंद सीआरटी टीम पोलिस आयुक्त कार्यालयात आहे. यापैकी ८०० गणेश मंडळे शहरात आहेत. तज्ज्ञांच्या मते, सुमारे सात लाख नागरिकांच्या घरी गणरायाची स्थापना होते. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक आठ विहिरींजवळ गोंधळ, गोंगाट, गर्दी हाेते. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. काही गणेशभक्तांचे अपघात होतात. भक्तांना सांभाळताना पोलिस यंत्रणेच्याही नाकीनऊ येतात. हा प्रकार टाळण्यासह प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील प्रत्येक वॉर्डांमध्ये विसर्जनाची तात्पुरती व्यवस्था केल्यास सर्वच यंत्रणांवरील ताण खूप कमी होऊ शकतो, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
‘दिव्य मराठी‘ची भूमिका
मनपानेवॉर्डावॉर्डांतच तात्पुरती टाकी ठेवण्याची व्यवस्था केली, तर नऊ विहिरींवर पडणारा गणेश विसर्जनाचा भार हलका होऊ शकतो. घराघरांतील श्रद्धाळूही आपल्या हातांनी बाप्पाला निरोप देऊ शकतील. यातून गर्दी, अपघातही रोखता येतील. या विसर्जन टाक्यांमध्ये मूर्ती विरघळल्यानंतर गाळ खत म्हणून वापरला जाऊ शकतो. तो त्या त्या परिसरातील उद्यानांमध्ये उपयोगात येईल.
६० वॉर्डांत त्रांगडे
शहरात११५ वॉर्ड असून या वॉर्डांसाठी नऊ विहिरी आहेत. नऊ विहिरींत ४५ वॉर्डांतील गणेशमूर्तींचे विसर्जन करता येते. यात सातारा, औरंगपुरा जिल्हा परिषद मैदान विहीर, एन-१२ विहिरी, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, संतोषीमातानगर, चिकलठाणा एअर पोर्टसमोर, पदमपुऱ्यातील विहिरींचा समावेश आहे. उर्वरित ७० वॉर्डांच्या जवळपास विसर्जन विहिरी नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागतो.
तात्पुरती व्यवस्था हवी
शहरातील ६०वॉर्डांत गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था नाही. मनपाने तात्पुरती व्यवस्था केली तर प्रदूषण, गर्दी, वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांवर मार्ग निघेल. किशोरगठडी, सचिव, निसर्ग मित्रमंडळ.
बातम्या आणखी आहेत...