आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा फी महापालिका भरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शैक्षणिक सत्राच्या दुसऱ्या महिन्याला प्रारंभ झाला तरी मनपाच्या शाळांची साडेसाती संपता संपत नसल्याचे सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत समोर आले. मनपाच्या शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थी असूनही पैशाअभावी ते मागे राहतात. कोचिंग स्पर्धा परीक्षांची फी भरणे अशक्य असल्याने मनपाने हा खर्च आपल्या फंडातून करण्याचे आदेश देऊन त्याची अंमलबजावणी आतापासून करण्याची सूचना महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या शाळांचे किती भाडे बाकी आहे ? असा प्रश्न राज वानखेडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाने माहिती देताना सांगितले की, शासनाकडे मनपाच्या शाळांच्या भाड्यापोटी ८३ कोटी १७ लाख ६८४ रुपये बाकी आहेत. त्यासाठी मनपाकडून शासनाने पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही उपायुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले. त्यावर २०१६ मध्येच आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पत्र पाठवले. इतर कुणी लक्ष दिले नाही. २० वर्षांत एकच पत्र पाठवले असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला. त्यावर राजू वैद्य यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना साधी आकडेमोडही करता येत नसल्याचे सांगितले. इतर शाळांच्या तुलनेत मनपाचे विद्यार्थी टिकण्यासाठी वर्षाला पाच ते सात लाख रुपये खर्चून खासगी शिकवणी देण्याची सूचना केली.
माधुरी अदवंत यांनी मनपाने किती विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला बसवले याची माहिती विचारली. त्यावर खुलासा करताना एकही विद्यार्थी आतापर्यंत बसत नव्हता. मात्र, यंदापासून मनपाने शिष्यवृत्ती, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम एनटीएसई इतर छोट्या -मोठ्या परीक्षांची फी मनपाने भरावी. पुस्तकेही उपलब्ध करून देण्याची मागणी निकम यांनी केली.
असुविधांचा पाढा कायम
शाळांमध्येमुलींसाठी शौचालय नाही, शाळा परिसरात चिखल झाला, संरक्षण भिंत नाही, अशा तक्रारी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, मनीषा मुंढे, राज वानखेडे, संगीता वाघुले, सुरेखा सानप, नंदू घोडेले, आशा निकाळजे यांनी वॉर्डातील शाळांच्या असुविधांचा पाढाच गिरवल्याने तुपे यांनी शाळांकडे लक्ष देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
बातम्या आणखी आहेत...