आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानझडे समर्थकांची आयुक्तांकडून झडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर अभियंता सखाराम पानझडे यांचे निलंबन रद्द करण्यासंदर्भात बैठक घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नजर वळवली असून एकेका अधिकाऱ्याला बोलावून त्याची खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुक्तांच्या खालोखाल मनपात शक्तिशाली बनलेल्या पानझडे यांच्यावर कारवाई होईल, असे मनपातील अधिकाऱ्यांना वाटतच नव्हते, पण हर्सूल तलावातील गाळ काढण्याचे टेंडर मर्जीतील ठेकेदाराला (हा ठेकेदार एमआयएमच्या नगरसेविकेचा भाऊ आहे.) मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा टीव्ही सेंटर ते जळगाव रोड या रस्त्याचे एक कोटी रुपयांचे काम टेंडर काढता एका विशिष्ट ठेकेदाराला देण्यात आल्याचा ठपका ठेवत बकोरियांनी पानझडेंच्या निलंबनाचे आदेश काढले. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. खास करून अभियांत्रिकी विभागात तर अधिकच अस्वस्थता पसरली.

अधिकाऱ्यांनी तातडीने सिडकोतील प्रभाग कार्यालयात बैठक घेत काय करता येईल यावर ऊहापोह केला. आपल्यावरही बकोरियांमुळे संकट येऊ शकते याची जाणीव झाल्याने ते अस्वस्थ होते. या बैठकीची माहिती फुटल्यावर आयुक्तांनी बैठकबाज अधिकाऱ्यांना झाल्या प्रकाराचा जाब विचारत कडक शब्दांत समजही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रभारी कुणीच नाही
पानझडेंच्यानिलंबनानंतर शहर अभियंता पद रिकामेच आहे. कार्यकारी अभियंत्याकडे या पदाचा कार्यभार देण्यास आयुक्त नाखुश आहेत. याशिवाय शहर अभियंता पद शासनाकडून प्रतिनियुक्तीवर भरता येत असल्याने पानझडेंची मक्तेदारी पूर्ण मोडून काढण्यासाठी शासनाकडून शहर अभियंता मागवण्याच्या हालचाली आयुक्तांनी सुरू केल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...