आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्मार्ट सिटी'साठी मनपा घेणार वॉररूमचा आधार , १९ जून रोजी दिल्लीत पुन्हा प्रेझेंटेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्टसिटी योजनेत शहराचा नव्याने समावेश करायचा असेल तर वॉररूमची गरज आहे. शहरातील नागरिकांकडून स्मार्ट सिटी संदर्भातील सूचना मागवण्यासाठी लोकांना जोडण्याच्या दृष्टीने आमखास मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात विशेष कार्यालयच तयार करण्याचे आदेश मनपाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी गुरुवारी दिले. या वेळी शहरातील उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद नापास झाले. त्यानंतर पुणे या स्मार्ट सिटीसाठी निवडल्या गेलेल्या शहरात काम केलेल्या ओमप्रकाश बकोरिया यांना औरंगाबाद मनपाचे आयुक्त म्हणून राज्य सरकारने पाचारण केले. त्यांचा पुण्यातील अनुभव या शहराच्या कामी येईल अशी अपेक्षा सर्वांना आहे. त्या पार्श्वभूमीवर बकोरिया यांनी गुरुवारी शहरातील उद्योग संघटनांची संशोधन केंद्रात बैठक घेतली. स्मार्ट सिटीसाठी १९ जूनपर्यंत दिल्लीतील स्मार्ट सिटीच्या सचिवांकडे पुन्हा नव्याने प्रेझेंटेशन सादर करावे लागणार आहे. वॉररूममध्ये नागरिकांचा फीडबॅक घेऊन त्याची डेटा बँक तयार करण्यात येईल. तसेच शहरावर आधारित वेबसाइट बनवण्यात येणार आहे. हे काम ग्लोबल एक्सपर्ट कंपनीचे प्रशांत देशपाडे यांच्याकडे देण्यात आले.

दर आठवड्याला बैठक
पुढीलटप्प्यात स्मार्ट सिटींमध्ये औरंगाबादचा समावेश व्हावा यासाठी निर्धार व्यक्त करत दर आठवड्याला बैठक घेण्याचे ठरले. या वेळी सीएमआयए, सीआयआयचे पदाधिकारी उपस्थित होते. १५ जूनपर्यंत रिक्वॉलीफायचा अर्ज भरायचा असून १९ जून रोजी दिल्लीत पुन्हा एकदा प्रेझेंन्टेशन होणार आहे.