आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mupta Union Strike At Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad

आमदार चव्हाण यांच्या शक्तिस्थळावर हल्ला, विद्यापीठातील विविध पदाधिकाऱ्यांवर आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवरील पदाधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदवून स्वाभिमानी मुप्टा संघटनेने त्यांची पदे तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. आमदार सतीश चव्हाण यांचे समर्थक असलेले व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी मदन यांच्यासह पाच जण, दोन विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्या परिषद आणि परीक्षा मंडळाच्या १२ सदस्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी दिवसभर धरणे, निदर्शने आणि ठिय्या आंदोलनही केले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे डॉ. शंकर अंभोरे यांनी या निमित्ताने आमदार चव्हाण यांच्या विद्यापीठातील वर्चस्वावर हल्ला चढवला आहे. या हल्ल्याला काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन परीक्षांच्या काळात विद्यापीठात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या सात-आठ वर्षांपासून विद्यापीठात चव्हाण यांचा शब्द प्रमाण अशी चर्चा आहे. त्यांच्याविरुद्ध तक्रार केली नाही. त्यामुळे आजच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-१९९४ च्या कलम-४५ नुसार व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद आणि परीक्षा मंडळाच्या सदस्यांना दुसरी टर्म घेता येत नाही. २००५-२०१० कालावधीत ज्यांनी विविध पदे भूषवले, त्यांनीच पुन्हा नियमबाह्यपणे २०१० ते २०१५ काळासाठी वर्णी लावून घेतल्याचा आक्षेप आहे. ऑगस्ट-२०१५ सर्व पदाधिकाऱ्यांचे सदस्यपदही संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वीच वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. डॉ. अंभोरे यांनी या आंदोलनाला शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हटले असून त्यासाठी सहकाऱ्यांसोबत प्रशासकीय इमारतीसमोर दिवसभर धरणे धरले. सायंकाळी वाजता निदर्शने केली. सायंकाळी पाचनंतर रात्री उशिरापर्यंत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या गैरहजेरीत प्रभारी कुलसचिव डॉ. के. व्ही. काळे यांच्या दालनात ठिय्या दिला.

डॉ.अंभोरे तर ब्लॅकमेलर : डॉ.अंभोरे हे ब्लॅकमेलर आहेत. प्राध्यापक असते तर त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले असते, कधीही वर्ग घ्यायचा नाही. सतत विद्यापीठात ठाण मांडून बसायचे आणि कुलगुरूंना त्रास द्यायचा त्यांचा जुना धंदा आहे. विद्यापीठाच्या बाहेरील अशैक्षणिक माणसे गोळा करून विद्यापीठात त्यांनी खंडणीचा बाजार मांडला आहे. त्यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही. कुलगुरूही अशा व्यक्तींच्या दबावाला बळी पडून निर्णय घेत आहेत - सतीश चव्हाण, पदवीधर आमदार
मुप्टा संघटनेचे विद्यापीठात दिवसभर आंदोलन
विद्यापीठ कायदा काय म्हणतो..?

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-१९९४ नुसार ४५ नुसार कोणतीही व्यक्ती यथास्थिती, निवडून आलेला, नामनिर्देशित केलेला, नियुक्त केलेला किंवा स्वीकृत केलेला सदस्य म्हणून व्यवस्थापन परिषदेचा किंवा परीक्षा मंडळाचा लागोपाठ दुसऱ्या मुदतीकरिता सदस्य असणार नाही. शिवाय अशी व्यक्ती सदस्य म्हणून निवडून आल्यास त्यांचे सदस्यपद बंद करण्यात येईल अथवा रिक्त समजण्यात येईल.
अशी आहे आरोपांची दुसरी बाजू
डॉ. मदन म्हणाले की, एकाच संवर्गातून (मतदारसंघ) कलम ४५ नुसार दुसऱ्या टर्ममध्ये निवडून येता येत नाही, हे खरे आहे. पण आम्ही वेगवेगळ्या संवर्गातून दुसऱ्या टर्मसाठी निवडून आलो आहोत. मी २०१० पूर्वीच्या कार्यकाळात अधिष्ठाता आता एमसी मेंबर आहे. डॉ. लघाने आधी एमसी मेंबर आता अधिष्ठाता आहेत. डॉ. गणेश शेटकार आधी अधिष्ठाता आता एमसी मेंबर आहेत. डॉ. विलास खंदारे पूर्वी विद्या परिषद सदस्य होते, आता अधिष्ठाता आहेत. डॉ. अप्पासाहेब हुंबे अधिष्ठाता होते, ते आता विद्या परिषद सदस्य आहेत. डॉ. पाटील या अधिष्ठाता होत्या, आता एमसी मेंबर आहेत. थोरे आणि विधाते यांचेही मतदारसंघ बदलले आहेत. त्यामुळे डॉ. अंभोरे यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही.
ज्यांच्यावर आक्षेप ते सर्व चव्हाण समर्थक
१. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मदन गतवेळी अधिष्ठाता व विद्या परिषद सदस्य होते.
२. डॉ. कल्याण लघाने यांच्याकडे सध्या वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठातापद आहे. त्यामुळे ते ऑगस्ट २०१५ पर्यंत विद्या परिषदेचे पदसिद्ध सदस्य आहेत. शिवाय परीक्षा मंडळावरही त्यांची वर्णी लागलेली आहे.
३. प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, डॉ. एस. जी. विधाते व प्रा. दादासाहेब मोटे हे दोन्ही कार्यकाळात विद्या परिषदेचे सदस्य आहेत.
४. प्रा. अप्पासाहेब हुंबे व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेचे सदस्य आहेत.