आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत दारूच्या पैशावरून तरुणाचा खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मद्य प्राशन करण्यासाठी पैसे देण्या-घेण्यावरून वाद झाल्याने सिडको एन-6 मध्ये बुधवारी (16 जानेवारी) रात्री अकरा वाजता कपिल ऊर्फ बंटी वैष्णव (26, रा. शुभश्री कॉलनी) याचा चाकू भोसकून खून करण्यात आला. रात्री दहाच्या सुमारास सिडको एन-6 येथील शुभश्री कॉलनीतील महाराणा प्रताप चौकात ही घटना घडली. याप्रकरणी समाधान व किशोर शिरसाट या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप बाविस्कर करत आहेत.
पवन वैष्णव (29) याने समाधानकडे मद्य प्राशन करण्यासाठी पैसे मागितले. त्याने नकार दिल्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. काही वेळानंतर रात्री पवन व त्याचा भाऊ कपिल तवेरा गाडीतून समाधानच्या घरासमोर गेले. सिडको एन-6 मधील बौद्ध विहारासमोरील मैदानात त्या दोघांनी समाधानला फोन लावून बोलावून घेतले. तो मैदानात येताच त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला. समाधान रात्री कोणाला भेटण्यासाठी गेला म्हणून त्याचा भाऊ किशोर ( 20 रा.सिडको, एन 6) हा मैदानाकडे गेला. दरम्यान समाधानला मारहाण सुरूच होती. त्याचा बचाव करण्यासाठी किशोरने समाधानला ओढले. या झटापटीत कपिल ऊर्फ बंटीला चाकू लागला. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळलेल्या कपिलला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती खालावल्याने मध्यरात्रीनंतर त्याला कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान सकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात 302 चा गुन्हा नोंदवण्यात आला.