आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन मुंबई महामार्गावर अज्ञात युवकाचा निर्घृण खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज: महानगरातील नवीन मुंबई महामार्गावर मंगळवारी अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्राने गळा चिरून त्याचा खून करण्यात आला आहे. मृतदेह कुजलेला असल्याने वैद्यकीय अहवालानंतरच पोलिस खुनाचा गुन्हा दाखल करणार आहेत.
नवीन मुंबई महामार्गाच्या कडेला व कै. भैरोमल तनवाणी इंग्रजी शाळेजवळ 35 ते 40 वर्ष वयाच्या अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला आहे. या युवकाचा इतरत्र गळा क ापून त्याचा मृतदेह येथे आणून टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाच्या अंगात पांढरी बनियान, जांभळ्या रंगाची अंडरवियर तर राखाडी रंगाची पँट आहे. मृतदेह पूर्णपणे कुजून दुर्गंधी सुटल्यामुळे हा खून किमान तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तातडीने मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. त्याच्या अहवालावरून खून कशाने व केव्हा केला? हे स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. उपनिरीक्षक एस.ए.खाडे पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांचे आवाहन : अनोळखी मृतदेहाबद्दल कुणाला माहिती असल्यास ती माहिती तपासासाठी कळवावी त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी केले आहे.