आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खून प्रकरणातील फरार महिलेची तीन नावे, माजी सैनिकाच्या खुनाचा गुंता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुकुंदवाडीतमाजी सैनिकाच्या खून प्रकरणातील संशयित फरार महिलेची तीन नावे समोर आली आहेत. यामुळे तपास करणारे पोलिसदेखील चक्रावून गेले आहेत. मृत माजी सैनिकाला तिने कमल राजपूत असे नाव सांगितले होते, पण पोलिसांच्या तपासात तिची कमल सूर्यवंशी, कमल खंडागळे आणि शकुंतला आनंदराव मुधोळकर अशीही नावे समोर आली आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
सहा दिवसांपूर्वी मुकुंदवाडी भागातील अंबिकानगर येथे संपतराव खंडागळे या माजी सैनिकाचा ठेचून खून केल्याची घटना घडली होती. खुनानंतर दोन दिवस मृतदेह बंद खोलीत ठेवला होता. घरमालकांना दुर्गंधी आल्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले होते. माजी सैनिक आणि फरार महिला दोघेच राहत होते. पोलिस त्या महिलेचा शोध घेत आहेत. कमल राजपूत असे या महिलेचे नाव असून ती मूळची नांदेडची आहे. पोलिसांचे एक पथक नांदेडलाही गेले होते. त्यांच्या तपासात आणखी दोन नावे उजेडात आली आहेत. विशेष म्हणजे तिचे शकुंतला आनंदराव मुधोळकर या नावाने पतियाळा बँकेत खातेही आहे. या नावाचे आयकार्डदेखील पोलिसांनी हस्तगत केले आहे.

महिलेचा शोध लागेना
खुनाचाउलगडा होऊन सात दिवस झाले, मात्र फरार आरोपीचा सुगावा लागत नाही. त्यामुळे तिचेही बरेवाईट तर झाले नाही ना, या निष्कर्षावर पोलिस आले आहेत. या महिलेचे अंबिकानगरातील ज्या महिलांसोबत संबंध होते त्यांचीही कसून चौकशी सुरू आहे. तसेच मृताच्या काही नातेवाइकांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.
संशयित महिला