आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटीत पत्नीची मुलीसमोरच गळा चिरुन हत्या, पळून जाणारा पती अपघातात ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तीन वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या पतीने त्याच्या आठ वर्षीय मुलीसमोरच पत्नीचा गळा चिरून खून केल्याचा थरार शुक्रवारी रात्री ७.४५ वाजता जवाहर काॅलनीतील जय विश्वभारती कॉलनीत घडला. अश्विनी विष्णू शिंदे (२९) असे मृत महिलेचे नाव असून मनोज मधुकर गुरुळे (रा. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर पसार होणाऱ्या आरोपीच्या (एमएच १४ ईपी ३०४२) कारला लासूर स्टेशनजवळील सिरसगाव येथे अपघात झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झालेल्या आरोपी पतीचा घाटीत उपचार दरम्यान रात्री १२ : ४० वाजता मृत्यू झाला. मुलगी रडत रडत म्हणाली, ‘माझ्या आईला बाबांनीच मारले.’ मुलगी भेदरली असून तिला धीर देण्याचे काम पोलिस करत आहेत.
पोलिस स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी ही आई वडील आठ वर्षीय मुलीसोबत मागील तीन वर्षांपासून राहत होती. नऊ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता, परंतु तीन वर्षांपूर्वी अश्विनी पती मनोजपासून घटस्फोट घेऊन विभक्त झाली होती. तिचे आईवडील कौटुंबिक कामानिमित्त नाशिक येथे गेल्याने ती तिची मुलगी घरी होती. अश्विनी शुक्रवारी साडेसातच्या सुमारास तिची मुलगी बहिणीची चार वर्षांच्या मुलीसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडली होती. घरी परतताना त्यांनी पावभाजीही विकत घेतली. दरम्यान, तिचा पती पाठलाग करत होता. तिघींनी घरात प्रवेश करतानाच मनोजने तिला अडवून गळ्यात चाकू खुपसला. यात अश्विनी गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटना कळताच पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर, उपनिरीक्षक मीरा लाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर बातमी...
बातम्या आणखी आहेत...