आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हजार रुपये देण्यासाठी नकार दिला म्हणून तरुणाचा गळा चिरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधी शेकोटी पेटवून मद्यपान केले. - Divya Marathi
आधी शेकोटी पेटवून मद्यपान केले.
औरंगाबाद - कोटला कॉलनीत रहाणाऱ्या अक्षय ज्ञानेश्वर गुळसकर या २३ वर्षीय तरुणाची गळा चिरुन निघृन खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. पडेगाव परिसरातील सरोश शाळेजवळ त्याचा रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या खिशातील दोन हजार रुपयांसाठी त्याच्यासोबतच्या मद्यपींनी आधी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि नंतर त्याचा गळा चिरला, असे पोलिस तपासात समोर आले असून या प्रकरणी सादातनगर येथील जावेद नावाच्या तरूणास ताब्यात घेण्यात आले. त्याने खुनाची कबूली दिली आहे. इतर संशयितांना ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेस्टेशन परिसरात एका अंडा आम्लेटच्या गाडीवर गुरुवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील तीन ते चार आरोपी अक्षयची ओळख झाली. अक्षयसोबतही त्याचे मित्र होते. आरोपींनी त्याच्या खिशातील दोन हजार रुपये पाहिले आणि ते लुटण्यासाठी त्यांनी त्याला पडेगावला पार्टी करू, असे निमंत्रण दिले. अक्षय सोबतच्या मित्रांनी पार्टीला येण्यास नकार दिला. दारूच्या आमिषाने तो आरोपींसोबत गेला. त्यांनी त्याला पडेगाव परिसरातील सरोश शाळेजवळील मैदानावर नेले. थोडावेळ मद्यप्राशन केल्यावर त्यांनी त्याच्याकडील पैसे हिसकवण्याचा प्रयत्न केला असावा त्यातच झटापट झाली. जीव वाचवण्यासाठी अक्षय पळत सुटला होता. त्याच्या अंगावर झडप घालत त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले गेले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन जाणुन घ्या सविस्तर बातमी... खिशातील चिठ्ठीवरुन पटली ओळख ​...

बातम्या आणखी आहेत...