आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून करून मृतदेह ड्रेनेजमध्ये टाकला, वाळूज एमआयडीसीत दुर्गंधीमुळे लागला शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/वाळूज- एका 35 वर्षीय तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह ड्रेनेज लाइनमध्ये फेकून दिल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. मृतदेह कुजल्याने मृताची ओळख पटू शकली नाही. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज एमआयडीसीतील श्री बालाजी इंडस्ट्रीज, प्लॉट नं एम-55 समोरील ड्रेनेजलाइनच्या ढाप्यातून दुर्गंधी येत असल्याची माहिती डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस आयुक्त एसबी चौगुले, पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, उपनिरीक्षक संजय आहिरे, सहायक फौजदार पंडित वाघ, पोलिस जमादार अनिल कदम, शेख हबीब, जी. वाय. बागडे, अनिल पवार, अमोल शिंदे व इतरांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ड्रेनेजलाइनवरील ढापा बाजूला सरकवला असता चार ते पाच फूट खोलीवर अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील आढळून आला. घटनास्थळी मदतीकरिता एमआयडीसी येथील अग्निशामक दलाचे जवानही दाखल झाले होते. या वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
चार ते पाच फूट खोल चेंबरमधील मृतदेह काढणे कठीण जात होते. जोगेश्वरीचे सरपंच योगेश दळवी यांनी ग्रामपंचायत कर्मचारी लाला कुर्‍हाडे व शिंदे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी चेंबरमध्ये उतरून मृतदेह बाहेर काढला. जमावाला पांगवून पोलिसांनी मृतदेह पोलिसांच्या अँब्युलन्सद्वारे घाटीत रवाना केला. हा मृतदेह गेल्या पाच ते सात दिवसांपासून ड्रेनेजच्या पाण्यात सडत असावा असा अंदाज वर्तवण्यात आला.
एका व्यक्तीकडून शक्य नाही
घटनास्थळावरील चेंबरचा 60 ते 70 किलो वजनाचा सिमेंट ढापा एका व्यक्तीस बाजूला सरकवणे किंवा पूर्ववत ठेवणे शक्य नसल्यामुळे या घटनेत एकापेक्षा अधिक लोकांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 26 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेली व्यक्ती व ड्रेनेजमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचे वर्णन मिळते जुळते असल्यामुळे त्या बाजूनेही तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक बहुरे यांनी सांगितले.