आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानदाराच्या डोक्यात फरशी घालून खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- किराणा सामानाची उधारी मागण्याच्या कारणावरून दुकानदाराच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता नवाबपुऱ्यात घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघे फरार झाले आहेत. सचिन भाऊलाला बसैये असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेतंतर त्यास घाटी रुग्णालयात दाखल केले असता परिसरात जमावामुळे तणाव निमाण झाला होता.
नवाबपुरा भागात सचिन बसैये यांचे किराणा दुकान आहे. या दुकानासमोरच सय्यद मुनीर कुटुंब राहते. त्यांच्या दोन मुलांपैकी सय्यद खय्युम याच्याकडे किराणा सामानाची उधारी होती. सचिनने उधारी मागितली म्हणून सय्यद खय्युम आणि सचिनमध्ये बाचाबाची झाली. खय्युम, त्याचा भाऊ, वडील आणि आई या सर्वांनी सचिनला बेदम मारहाण केली. दरम्यान, त्याच्या डोक्यात फरशी घातल्यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सचिनचा मोठा भाऊ संतोष यांनी तक्रार दिल्यानंतर िजन्सी पोलिसांनी खय्युम आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुनीरला ताब्यात घेतले.
खुनानंतर नवाबपुरा भागात पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह, उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस िनरीक्षक अविनाश आघाव, बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन शांततेचे आवाहन केले. रात्री उशिरा खय्युम यास गंगापुरात अटक करण्यात आली.