आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murder False Information,latest News In Divya Marathi

खोटी माहिती देणा-याची पत्नी दिरासोबत हैदराबादेत, पत्नीचा खून केल्याची दिली होती पोलिसांत माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- बेपत्ता पत्नीचा खून करून तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिल्याचा दावा करणा-या पती पुंडलिक गुंजुटे (30, रा. दत्तनगर, रांजणगाव शेणपुंजी) याचे अखेर बिंग फुटले. सास-याने मारहाण केल्यामुळे मी तसे खोटे सांगितल्याची कबुली त्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांत मंगळवारी रात्री उशिरा दिली, तर बेपत्ता पत्नी महानंदा तिच्या चुलत दिरासोबत असून ते दोघे हैदराबादेत सुखरूप असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांगितले.
रांजणगाव शेणपुंजीमध्ये दत्तनगरात भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या पुंडलिक गुंजुटे याची पत्नी महानंदा हिचे त्यांच्यासोबतच राहणाऱ्या तान्हाजी या चुलत दिराशी सूत जुळले होते. याची कुणकुण पुंडलिकलाही लागली होती. त्यामुळे या कारणावरून महानंदा व पुंडलिकमध्ये अधूनमधून वाद होत होते. परिणामी, या वादामुळे महानंदा व तान्हाजी यांना भेटीत अडथळे येऊ लागले. त्यामुळे 28 सप्टेंबरला पुंडलिक कामावर गेलेला असताना सकाळी 9 वाजेच्या सुमारास महानंदा व तान्हाजी यांनी दोघांनी घरातून पळ काढला. ते थेट तान्हाजी याने पूर्वी काम केलेल्या ठिकाणी- हैदराबादेत पोहोचले. दरम्यान, कामावरून पुंडलिक घरी पोहोचल्यानंतर हा प्रकार त्याच्या लक्षात आला. रात्रभर सखोल विचार केल्यानंतर त्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांत पत्नी महानंदा बेपत्ता झाल्याचे सांगून तान्हाजीवर संशय व्यक्त केला. तान्हाजीचा मोबाइल नंबरही पोलिसांना देऊन तो 29 सप्टेंबर रोजी चाकूरला जाण्यासाठी निघाला होता. तेथे त्याला रात्रीचे अडीच वाजले. रात्री उशिरा फिरत असलेल्या पुंडलिकला चाकूर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने पत्नी महानंदाचा खून करून तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची कबुली िदली होती. तेव्हा ही माहिती चाकूर पोलिसांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी सर्व नाल्यांमध्ये शोधमोहीम राबवली मात्र कुठेही पुरावा आढळून आला नाही. त्यानंतर चाकूर पोलिसांनी पुंडलिकला
वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

चुकीची माहिती
पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी पुंडलिककडे चौकशी केल्यानंतर त्याने पत्नी महानंदाचा खून केला नसून ती चुलत भाऊ तान्हाजीसोबत पळून गेल्याचे सांगितले, तर मला सासऱ्याने मारहाण केल्यामुळे मी चाकूर पोलिसांना तिचा खून केल्याचे खोटे सांगितल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी तान्हाजीच्या मोबाइल टॉवरचे लोकेशन तपासले असता, ते तान्हाजीने पूर्वी काम केलेल्या हैदराबादेत मिळाल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिस निरीक्षक बहुरे यांनी स्पष्ट केले. सध्या पुंडलिक हा चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहे.