आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावत्र मुलीवर अतिप्रसंग करणार्‍या पित्याचा गळा आवळून खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: मद्यधुंद अवस्थेत अब्रू लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या सावत्रबापाचा अल्पवयीन मुलीने आईच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केला. ही घटना सिडको एन-2 मधील संघर्षनगरात शनिवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी मायलेकीला अटक केली आहे. रामेश्वर भगवान जाधव असे मृताचे नाव आहे.
रामेश्वर (36) हा रंगकामाचे कंत्राट घेतो. पहिल्या पत्नीला सोडून दिल्यानंतर त्याने शोभाबाईशी दुसरा संसार थाटला. शोभाबाईला (32) तिच्या पहिल्या पतीपासून एक मुलगी आणि दोन मुले आहेत. मुलगी 17 वर्षांची आहे.

शनिवारी रात्री रामेश्वरने मद्यधुंद अवस्थेत रात्री 12 च्या सुमारास सावत्रमुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलीने आईला आवाज देऊन जागे केले. तिने रागाच्या भरात रामेश्वरच्या डोक्यात स्टोव्ह मारला. त्यानंतर दोघींनी रामेश्वरला बेदम मारहाण करून त्याचा दोरीने गळा आवळला. त्यामुळे रामेश्वर बेशुद्ध पडला. घटनेनंतर शोभाबाईने थेट मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. घटनेची हकिकत सांगून तिने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी रामेश्वरला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात रामेश्वरचा लहान भाऊ गजानन भगवान जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शोभाबाईला अटक करून तिच्या मुलीलाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोरी आणि स्टोव्ह जप्त केला आहे.
वेडसर महिलेवर अतिप्रसंग करणार्‍या माजी उपसरपंचाला तरुणांनी चोपले
इनामबारी आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर अतिप्रसंग