आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामडीत ३५ वर्षीय व्यक्तीचा खून, मित्राला केली अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- अज्ञात कारणाने ३५ वर्षीय व्यक्तीचा खून करून त्यास नदीच्या काठावर ठेवल्याचा प्रकार जामडी (घाट) येथे मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आला. लक्ष्मण वावरे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संतोष पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले. १६ नोहेंबर रोजी सायंकाळी संतोष लक्ष्मण पवार (२५, रा. जामडी घाट) ह. मु. औरंगाबाद व लक्ष्मण सखाराम वावरे (रा.उस्मानपुरा, औरंगाबाद ) हे दोघेही कन्नड तालुक्यातील जामडी (घाट) येथे आले होते. लक्ष्मणचा खून झाला. त्यानंतर त्यास नदी काठावर टाकले. या घटनेची माहिती किशोर जाधव यांनी कन्नड पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन व पोलिस उपनिरीक्षक रोहित बेंबरे, दिपेश नागझरे, मनोज घोडके, गोरक्ष भामरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लक्ष्मण वावरे यास उत्तरीय तपासणीसाठी वडनेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिसांनी नेले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने पोलिसांना ताटकळत बसावे लागले. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए.के. विडेकर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केल्याने औराळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दाटे यांनी लक्ष्मणची उत्तरीय तपासणी कन्नड येथे केली. रामभाऊ सखाराम वावरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष लक्ष्मण पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.