आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: पत्नीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न, अर्थिंगची तार पकडल्यामुळे बचावला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरेनगरात राहणारी विवाहिता शिल्पा दीपक जोगदंड (२८) हिचा चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून करून पती दीपक याने उघड्या विद्युत डीपीला स्पर्श करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने मुख्य विद्युत तारेऐवजी अर्थिंगची तार पकडली. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेऊन दीपकला वाचवले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

वडगाव कोल्हाटीमधील दर्गा रोड, सलामपुरेनगर येथे काशीनाथ मुंगसे यांच्या घरात भाड्याने राहणारे जोगदंड दांपत्य मूळचे परभणी जिल्ह्यातील देगाव तालुका येथील आहे. कामासाठी हे दांपत्य वडगाव कोल्हाटीत स्थायिक झाले. शिल्पा दीपक यांना श्रावणी (४ वर्षे) शिवन्या (२) या दोन मुली आहेत. व्यवसायाने मिस्त्री असलेला दीपक पत्नी शिल्पावर संशय घेत होता. 

काय घडले? 
आठ दिवसांपूर्वी शिल्पाच्या बहिणीचा मुलगा अविनाश सरवदे (१७, रा. मुंबई) तिच्याकडे आला होता. काकांच्या सांगण्यावरून अविनाश शिवन्याला घेऊन ११.३० वाजता घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी गेला. अर्ध्या तासानंतर परतलेल्या अविनाशला त्याची मावशी खाली फरशीवर पडलेल्या अवस्थेत दिसली. दीपकने त्याला ‘तुझी मावशी झोपली आहे, तिला उठवू नको! तू शिवन्याला बाहेरून परत एकदा फिरवून आण,’ असे सांगितले. फिरून आलेल्या अविनाशला शेजाऱ्यांनी तुझ्या काका-मावशीचे भांडण झाल्याचे सांगितले. त्यामुळे तो घरात गेला. तो मावशीला उठवण्याचा प्रयत्न करत असतानाच दीपकने घरातून धूम ठोकली. दीपक का पळत आहे, तो कुठे जातो? या कुतूहलापोटी शेजारील नागरिकही त्याच्या मागे धावले. दीपकने गावालगतच्या उघड्या डीपीच्या विद्युत तारेला पकडून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पकडलेली तार अर्थिंगची निघाली. त्याला विजेचा हलका धक्का बसून तो मागे फेकला गेला. तोपर्यंत त्याच्या मागे आलेल्या लोकांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. 

बेशुद्धावस्थेतील शिल्पाला लगतच राहणाऱ्या तिच्या भावाने अॅपेरिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. एमआयडीसी वाळूज ठाण्यात पती दीपकविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक नाथा जाधव पुढील तपास करत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...