आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिडकीन येथे जमिनीच्या वादातून महिलेचा खून, 4 जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बिडकीन, रांजणगाव येथील एका पन्नास वर्षीय महिलेचा जमिनीच्या वादातून निर्घृणपणे खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून चार आरोपींना १२ तासांत अटक केली. महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीत चार जणांचे संशयित म्हणून नावे होते. मात्र घटना घडल्यापासून ते फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेत बिडकीन पोलिसांच्या ताब्यात दिले.   

 बिडकीन येथील रांजणगाव रस्त्यावर शनिवारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने महिलेचा खून केला होता. पोलिस तपासानंतर बिडकीन येथे राहत असलेल्या झालाबाई सोपान काळे या महिलेचा मृतदेह असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी आपले सूत्र हलवले. खास करून गुन्हे शाखेचे पथक बिडकीनमध्ये ठाण मांडून होते. गुन्हे शाखेने मृत महिलांबाबत माहिती काढली असता त्यांच्या जमिनीचा वाद सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने गुन्ह्याचा तपास करून काळे, पिंट्या पंढरीनाथा काळे, सदाशिव पांडुरंग काळे, ठाकूर पंढरीनाथा काळे यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. 

प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, सागर पाटील ,अबूबकर, दीपक देशमुख यांनी केला. पुढील तपास एपीआय सोनवणे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...