आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murder Or Accident Death Police Confused In Kultabad Men Death

"त्या' युवकाचा अपघाती मृत्यू नव्हे खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील गदाना येथील एका युवकाचा घरातील पाण्याचा हौदात पडून संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (३१ डिसेंबर) घडली. आकाश देविदास लाटे (१७) असे त्या तरुणाचे नाव आहे. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती पुराव्यांवरून हा खून असल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रकरणाची चौकशीची दिशा बदलत खुलताबाद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

बुधवारी सायंकाळी सहा वाजता घरातील पाण्याच्या हौदात पडून आकाशचा मृत्यू झाला. कापूस वेचून सायंकाळी घरी परतलेल्या आजीने हा प्रकार पाहून तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार विभागीय पोलिस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी गदाना येथे धाव घेतली. घटनास्थळ गाठल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. दरम्यान, आकाशचे मामा अण्णा साळुंखे यांनी कुणीतरी आकाशच्या तोंडाला रूमाल बांधून त्याला ठार मारले आणि मृतदेह हौदात टाकला, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी आकाशच्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता आकाशच्या गळ्याला आेरखडल्याच्या खुणा आढळल्या.
या प्रकारावरून त्याचा गळा दाबून खून करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. या घटनेत एकापेक्षा जास्त मारेकऱ्यांचा समावेश असावा, असाही पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणाचा तपास त्वरेने पूर्ण करण्यासाठी पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी गुन्हेशाखेचे विशेष पथक नेमले आहे. या पथकासह खुलताबादचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे तसेच सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ रामोड सखोल चौकशी करत आहेत.
तपासाचे आव्हान
आकाशबाजार सावंगी येथील ज्ञानकुंज महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो दररोज गदाना ते बाजार सावंगी येथे ये-जा करत होता. अतिशय शांत आणि कुणासोबतही वाद नसणाऱ्या आकाशचा खून कुणी आणि कशामुळे केला, असेल हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
जमिनीचा वाद की प्रेम संबंध ?
आकाशमूळचा मावसाळा या गावाचा रहिवासी होता. आई-वडिलांमध्ये कुरबुरी होत असल्यामुळे तो लहानपणापासून आजी-आजोबांकडे राहत होता. आजीची तीन एकर जमीन असून या जमिनीचाही वाद सुरू आहे. यावादातून किंवा प्रेम संबंधातून आकाशचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.