आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेतील सराफाच्या खुन्यांना येवल्यात अटक, अपहरण करून केला होता खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत शैलेश ठक्कर. - Divya Marathi
मृत शैलेश ठक्कर.
अाैरंगाबाद - औरंगाबाद येथील सराफा व्यापारी शैलेश ठक्कर यांचे अपहरण करून खून करणाऱ्या दरोडेखोरांना तब्बल दीड वर्षानंतर येवला पोलिसांनी अटक केली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंदरसूल शाखेतील ५० लाख रुपये लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचे मुख्य सूत्रधार अजित कोल्हे व तौसिफ शेख याने ठक्कर यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मालेगावचे अप्पर पाेलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिवाणदेवडी भागातील सराफा व्यापारी शैलेश भरतकुमार ठक्कर यांचे कासारी बाजारात स्वामी नारायण ज्वेलर्स दुकान आहे. ९ नोव्हेंबर २०१३ रोजी ते नेहमीप्रमाणे सोन्याच्या व्यापारासाठी गेले होते. वैजापूर येथील व्यापाऱ्यांना सोने दिल्यानंतर ते येवल्याकडे निघाले होते. त्यांनी दुपारी चार वाजता येवल्याच्या व्यापाऱ्यांना फोन करून येत असल्याचेही कळवले होते, मात्र वाटेतच उंदीरवाडी- अंदरसूलदरम्यान ते बेपत्ता झाले होते. १३ नोव्हेंबर २०१३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा परिसरात प्रवरा नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. तेव्हापासून पोलिस ठक्कर यांच्या खुन्यांचा शोध घेत होते.

सुमारे वीस दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा बँकेच्या अंदरसूल शाखेची ५० लाखांची रक्कम दरोडेखोरांनी डोळ्यात मिरची पूड फेकून पळवली होती. येवला पोलिसांनी याप्रकरणी तौसिफ शेख, अजित कोल्हे, किशोर धनगे, शंकर ऊर्फ भंबू मिसाळ, संतोष ऊर्फ सोनू वल्टे यांना अटक केली असून तौसिफ आणि अजित या दोघांनी शैलेश ठक्कर यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचे कडासने यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...