आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murderer Of Mansi Either Execution Or Life Imprisonment

मानसीेच्या खुन्यास फाशी की जन्मठेप, निकाल राखीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अहिंसानगरातील मानसी देशपांडे या तरुणीच्या निर्घृण खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या जावेद खान हबीब खान ऊर्फ टिंगऱ्याच्या शिक्षेत वाढ करण्यात यावी, त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार पक्षाच्या वतीने औरंगाबाद हायकोर्टात अपील दाखल करण्यात आले आहे. अपिलावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे आणि न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी निकाल राखीव ठेवला आहे.

अहिंसानगरातील अपूर्व अपार्टमेंटमध्ये मानसी शंकर देशपांडे आणि तिचा भाऊ अनिकेत राहत होते. १२ जून २००९ रोजी अनिकेत वाळूज येथील कंपनीत कामाला गेला होता. मानसी घरात एकटीच झोपलेली असताना चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या टिंगऱ्या उर्फ जावेद खान याने मोबाइल, सोन्याची अंगठी रोख ४५० रुपये आदींची चोरी केली. त्यानंतर मानसीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हर घालून आणि शरीरावर २१ वार करून निर्घृण खून केला होता. अनिकेतच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला होता.

२०१२मध्ये जन्मठेपेची शिक्षा
सायबरसेलचे तत्कालीन पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्या तपासात मानसीचा चोरीला गेलेला मोबाइल हॉटेल व्यावसायिक प्रदीप चंडालिया यांच्याकडे सापडला. त्यांना तो टिंगऱ्याने दिल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी टिंगऱ्याला ताब्यात घेतले असता पोलिसांनी चोरी, बलात्कार आणि खून त्यानेच केल्याचा शोध लावला होता. पोलिस निरीक्षक सोपान बोरसे यांनी २२ जून २००९ रोजी प्रदीप चंडालिया, राम बोडखे आणि जावेद खान ऊर्फ टिंगऱ्या यांना अटक केली. या खटल्याच्या सुनावणीअंती जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एन. पाठक यांनी २४ जानेवारी २०१२ रोजी जावेद खान ऊर्फ टिंगऱ्या यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

२१ वारकरून केला होता खून
हायकोर्टात मागितली दाद

टिंगऱ्याला देण्यात आलेली ही शिक्षा अपूर्ण आहे, त्याला फाशीची शिक्षाच व्हायला हवी होती. किमान त्याला पूर्ण कालावधीची जन्मठेपेची शिक्षा तरी व्हायला हवी होती, या कारणावरून राज्य सरकारच्या वतीने आैरंगाबाद हायकोर्टात या शिक्षेला अव्हान देण्यात आले. न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे आणि न्यायमूर्ती इंदिरा जैन यांच्यासमोर सुनावणी झाली असता अतिरिक्त लोकभियोक्ता सुनील सोनपावले यांनी युक्तिवाद केला की, मानसी देशपांडे हिच्यावर अत्याचार करून झालेला खून हा अत्यंत क्रूरपणे केलेला गुन्हा आहे. अत्याचार करणाऱ्यास जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, हा संदेश समाजात गेला पाहिजे म्हणून जावेद खान ऊर्फ टिंगऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायलयाच्या अनेक निवाड्यांचा संदर्भ दिला. या अपिलावर उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली असून निकाल राखीव ठेवला आहे.