आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पं. नाथराव नेरळकरांच्या स्वरांची रसिकांवर मोहिनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संगीतनाटक पुरस्कार विजेते, मराठवाडा भूषण पं. नाथराव नेरळकर यांच्या स्वरांची जादूगिरी शनिवारी औरंगाबादकर रसिकांनी अनुभवली. चौदाव्या स्व. गोविंदभाई श्रॉफ महोत्सवाचा पहिला दिवस रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. प्रारंभी संतूरवादक पं. दिलीप काळे यांनी तंतुकारीच्या लाटांवर स्वार केले, तर स्वरांच्या विश्वात रममाण झालेल्या रसिकांनी भैरवीचे स्वर मनात जपत निरोप घेतला. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित संगीत महोत्सवाचे हे वर्ष विशेष ठरले. कारण आतापर्यंत महोत्सवाची धुरा पडद्यामागे राहून सांभाळणाऱ्या पं. नेरळकर गायन केले.

पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य पं. काळे यांच्या संतूरवादनाने शनिवारी महोत्सवाची सुरुवात झाली. राग जनसंमोहिनीत आलाप-जोड-झाला वाजवत त्यांनी रसिकांना संतूरच्या तारांवर खिळवून ठेवले. तबल्यावर साथीला असलेले शोण पाटील यांनी तंतुकारीला साज चढवला. जुगलबंदीत त्यांनी रूपक तालात गत तर त्रितालात द्रुत गत वाजवली. पहाडी धून वाजवत त्यांनी निरोप घेतला.

भोरभये तब...172.20.107
महोत्सवाचेदुसरे सत्र पं. नाथराव नेरळकरांच्या स्वरांनी चिंब झाले. राग बागेश्रीत ‘कौन गत भई’ हा बडा ख्याल त्यांनी गायला, तर ‘छाेड दे रे मोरी बैया’ हा छोटा ख्याल रंगत भरणारा होता. यामध्ये त्यांनी घेतलेल्या ताना-बोलताना अन् सरगम दाद मिळवत होत्या. ‘भोर भये तब आये पिया मोरे, जाग परी मैं तो पिया के जगाये’ ही प्रेमरसातील ठुमरी गुलाबी थंडीत वातावरण बांधून ठेवणारी ठरली. भैरवीने सांगता झाली. संवादिनीवर जयंत नेरळकर, तबल्यावर प्रफुल्ल काळे, तानपुऱ्यावर दिनेश संन्यासी, रवींद्र खोमणे यांनी साथ केली. प्रा. किशोर शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले.