आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Musician, Singer Ankeet Tiwari, Latest News In Divya Marathi

रिजेक्ट झालेल्या "सून रहा है ना तू' ने मिळवून दिले यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आशिकी -२ चित्रपट सुरू होण्याच्या एक वर्ष आधी 'सून रहा है ना तू' हे गाणे अनेकांना ऐकवले. मात्र कुणालाही ते आवडले नाही. अनेक ठिकाणी रिजेक्ट झाले. आशिकी चित्रपटाच्या वेळी मोहित सुरीला हे गाणे ऐकविले आणि त्याला ते फार आवडले. हे गाणे कुणालाही यापुढे ऐकवू नकोस, असे त्याने सांगितले. पण चित्रपटात हे गाणे घेणार किंवा नाही हे निश्चित नव्हते. अगदी शेवटच्या क्षणी हे गाणे चित्रपटात घेतले अन् मी रसिकांच्या नजरेत आलो. अगदी फिल्मी वाटावी, अशी कहाणी संगीतकार, गायक अंकीत तिवारीने गायलेल्या ह्यसून रहा है ना तूह्ण या गाण्याची असल्याचे सांगितले.

प्रोझोन मॉलच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी अंकित शहरात आला असताना त्याने पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्याने दिलखुलासपणे गप्पा मारल्या. या वेळी प्रोझोनचे अनिल इरावणे यांची उपस्थिती होती. सध्या आमिर खानच्या "पी. के.'आणि रणबीर कपूरचा रॉय, इम्रान हाश्मीचा "मिस्टर एक्स' असे चित्रपट मी करतो आहे. वडत्या संगीतकारांिवषयी तो म्हणाला, आर. डी. बर्मन, ए. आर. रहेमान, शंकर-जयकिशन यांसह अनेक युवा पिढीचे संगीतकार मला आवडतात. यामध्ये मराठीतील अजय-अतुल मला विशेष आवडतात. त्यांनी बनवलेल्या अग्निपथ या चित्रपटाची गाणी मला आवडतात. मोरया मोरया हे गाणेही मला भावले. त्यामुळे मी संगीतामुळे कनेक्ट झालो आहे. त्यांचा स्वभाव मला फार आवडतो. मी त्यांना प्रत्यक्ष कधीच भेटलो नाही, पण संगीत माणसाचा स्वभाव सांगतो. मी त्यांचे संगीत जे काही ऐकले त्यावरून त्यांचा स्वभाव मला कळाला आणि आवडलासुद्धा. ह्यव्हिलनह्ण चित्रपटातील "तेरी गलीयाँ गलीयाँ' सध्या प्रत्येकाच्या तोंडी आहे. मराठीतील अजय-अतुल हे मला प्रचंड आवडतात. मला त्यांच्या सोबत मराठीत काम करायला आवडेल, असे त्याने सांिगतले. मी भारतीय शास्त्रीय संगीत सहा वर्षे शिकलो आहे. प्रत्येकाची एक स्टाइल असते, तशी माझीही आहे. संगीतातून प्रत्येक प्रकारचा मूड मांडला जातो, संगीतातून मूड बदलताही येतो. अजून खूप मजल गाठायची आहे, ही फक्त सुरुवात आहे.
मराठीमध्ये काम करणार
आगामी काळात उत्तम संधी मिळाली तर नक्की मी मराठीतही काम करणार असल्याचे त्याने आवर्जून सांगितले. संगीताची भाषा प्रत्येकाला कळते. मग तो कुठल्याही जातीधर्माचा असो किंवा वयोगटाचा असो. मी नजरेत आलो ते ह्यआशिकी -2 साठी केलेल्या 'सून रहा है ना तू'या गाण्यामुळे. त्याआधीही मी 3-4 चित्रपट केले. त्यासाठीही मी खूप मेहनत घेतली पण या गाण्यानंतर एका रात्रीत प्रकाशझोतात आलो. याचे कारण मानवी मनाची भावना असेच आहे.