आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Girl Signature Mission At Aurangabad For Reservation

आरक्षण स्वाक्षरी मोहिमेत मुस्लिम युवतींचाही सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या अनेक वर्षांपासून दारिद्रय़ात खितपत असलेल्या मुस्लिम समाजाला प्रगतीची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी त्यांना 15 टक्के आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी मायनॉरिटी फ्रंटच्या वतीने शहरात स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे. त्यात महाविद्यालयीन युवती हिरीरीने सहभागी होत असल्याचे फ्रंटचे अध्यक्ष डॉ. फेरोज खान यांनी सांगितले.
डॉ. खान, सुलतान खान, जफर खान आदींच्या प्रमुख उपस्थितीत 20 डिसेंबर रोजी जामा मशीद येथून अभियानाची सुरुवात करण्यात आली. शहागंज, सराफा, सिटी चौक, रोशनगेट, काली मशीद आदी ठिकाणी टप्प्याटप्प्याने अभियान राबवण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आता हे अभियान महाविद्यालयांमध्ये सुरू झाले आहे. त्यात समाजातील युवती हिरीरीने सहभागी होत आहेत. इतर सर्व समाज त्यांना वेळोवेळी मिळालेल्या सवलतींमुळेच प्रगतिपथावर जात आहेत. मग मुस्लिमांना हक्काचे आरक्षण का नको, असा सवालही त्यांनी डॉ. खान यांच्याशी बोलताना केला. आतापर्यंत सुमारे 60 हजार नागरिकांनी अभियानात सहभाग घेतला असल्याची माहिती डॉ. खान यांनी दिली.
उद्या विभागीय आयुक्तालयावर धरणे आंदोलन
आरक्षणाच्या मागणीसाठी 27 डिसेंबरला दुपारी अडीच वाजता विभागीय आयुक्तालयावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदनही दिले जाणार आहे. आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फ्रंटतर्फे करण्यात आले आहे.