आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Reservation Is Anti Constitution Said By Fadnavis, Divya Marathi

मुस्लिम आरक्षण संविधानविरोधी : फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नसल्यामुळे भाजपचा मुस्लिम या आरक्षणाला विरोध आहे. केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही, तर त्यांच्या विकासाचे प्रश्न सोडवावे लागतील. मौलाना आझाद मंडळाकडून 1000 कोटींपैकी फक्त 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मराठा आरक्षणही न्यायालयात टिकेल की नाही अशी शंका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
लोकसभेनंतर सरकारने निर्णयांचा सपाटा लावला आहे. मात्र, जे योग्य निर्णय नसतील त्याबाबत सत्तेत आल्यावर फेरविचार करू. वक्फ बोर्डात दहा हजार कोटींचा घोटाळा झाला असून त्याबाबतचा अहवाल सरकार दडवत आहे. त्यामुळे सत्तेत आल्यास वक्फच्या जमिनी पुन्हा ताब्यात घेऊ. याशिवाय कृपाशंकर सिंगांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे परवानगी मागितली आहे. मात्र, सरकारकडून त्यांना वाचवण्याची धडपड सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, सुरजितसिंह ठाकूर, हरिभाऊ बागडे, गोविंद केंद्रे, शिरीष बोराळकर उपस्थित होते.
मराठवाड्यात अनुकूल वातावरण
मराठवाड्यात भाजपला अनुकूल वातावरण असून या निवडणुकीत भाजप क्लीन स्वीप करेल, असा दावा फडणवीस यांनी केला. मुंडेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते काम करत आहेत. पंकजा मुंडेदेखील कोअर कमिटीच्या माध्यमातून काम करत आहेत, असे सांगून भाजपला नेतृत्व नाही या अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सुप्रियांचे नेतृत्व पुढे येत आहे, त्यामुळे त्यांनी केवळ त्यांच्या पक्षात लक्ष द्यावे, असा सल्ला दिला.