आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या वातावरणात माय एफएमला प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित रसिकांशी संवाद साधला. या वेळी माय एफएम ९४.३ चे आरजे. - Divya Marathi
अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित रसिकांशी संवाद साधला. या वेळी माय एफएम ९४.३ चे आरजे.
औरंगाबाद - ढोल-ताशांचागजर, गणेशवंदना, कथ्थक लोकनृत्याचे फ्यूजन, अभिनेते मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती अशा मराठमोळ्या वातावरणात सोमवारी संध्याकाळी माय एफएम ९४.३ सुरू होत असल्याची घोषणा करण्यात आली.
हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात पंकज अग्रवाल, दीपक सरोदे, अरुण जाधव, अभिजित देशमुख, मुकुंद भोगले, आशिष गर्दे, शिरीष बोराळकर, सुलतान, अमित भुमा, सुभाष चांदणे, डॉ. प्रदीप देशपांडे, विजय लेकुरवाळे, रोहन देशपांडे, मुकेश राजपूत, दिव्येश कपारिया, विकास चौधरी, सुनील पाटील, जुगलकिशोर तापडिया, राजू बागडे, नरेंद्र जबिंदा, रवी वट्टमवार, भास्कर चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.

"आमची संस्कृती’या ढोलपथकाच्या सादरीकरणाने कार्यक्रम सुरू झाला. अजय शेंडगे, रोहित महाजन यांच्या कथ्थक लोकनृत्याचे फ्यूजनला रसिकांनी दाद दिली. रोज सादर होणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही देण्यात आली. मकरंद अनासपुरे हेही माय एफएमच्या माध्यमातून औरंगाबादकरांशी संवाद साधणार आहेत. माय एफएमचे सीईओ हरीश भाटिया, नॅशनल सेल्स हेड राहुल नामजोशी, चिफ प्रोग्रामिंग ऑफिसर विपलो गुप्ता, महाराष्ट्र प्रॉडक्ट हेड कंकणा लोहिया, स्टेशन हेड नितीन लोखंडे, ‘दिव्य मराठी’चे सीओओ निशित जैन, राज्याचे संपादक प्रशांत दीक्षित, निवासी संपादक दीपक पटवे, युनिट हेड अमित डिक्कर उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...