आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Native land 'freedom Sangramala The First Polish

‘माय मातृभूमी’ नाटकातून स्वातंत्र्य संग्रामाला उजाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-स्फूर्ती महिला मंडळाच्या ‘विशाखा’ गटाने बुधवारी(22 जानेवारी) सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘माय मातृभूमी’ या नृत्य-नाटकातून स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींना तसेच विविध लढय़ांना उजाळा दिला.
एन - 5 येथील गीता भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा अनुराधा सुभेदार यांची तर निमंत्रित पाहुण्या म्हणून प्रा. जयर्शी सुरडकर यांची उपस्थिती होती.
8 ऑगस्ट 1942 ला झालेल्या ‘चले जाव’ची चळवळ, 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य, यानंतरचा हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि 1948 ला निझामाच्या राजवटीतून मराठवाड्याला मिळालेले स्वातंत्र्य तसेच स्वामी विवेकानंदांची 100 वी पुण्यतिथी असे विविध प्रसंग या नाटकातून उभे करण्यात आले. शैलजा देशपांडे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत या नाटकात महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई र्शॉफ अशा विविध नेत्यांना दाखवण्यात आले.
या सर्वांनी देशाच्या आणि मराठवाड्याच्या स्वातंत्र्यात बजावलेली भूमिका, त्यांचे व्यक्तिमत्त्व यानिमित्ताने सर्वांपुढे मांडण्यात आले. मुस्लिम नेते नवाब उस्मानअली बहाद्दूर आणि कासीम रझवी यांच्याही व्यक्तिरेखांचा समावेश नाटकात करण्यात आला होता. यामध्ये कालिंदी कोरडे, शैलजा देशपांडे, जयर्शी जोशी, सुमन गाडगीळ, सरला कुलकर्णी, प्रमिला वांगीकर, कलावती मानवीकर, सुमन कुलकर्णी, डॉ. अरुणा खारकर, मृणाल जोशी आणि बालकलाकार म्हणून सिद्धी चौधरी यांचा समावेश होता.
सुमन कुलकर्णी यांनी मुलीला पाहुणे पाहायला आल्यावर उडालेल्या गमती-जमतीचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात अनेकदा गमती घडतात आणि मग कसा हशा होतो, हे यातून दाखवण्यात आले.
नाटक सादर करताना स्फूर्ती मंडळाच्या विशाखा गटाच्या सदस्या.
अंधर्शद्धेवर एकपात्री प्रयोगातून भाष्य
बुवाबाजी करणार्‍याला समाज बळी पडत आहे. अशिक्षित वर्ग आणि शिक्षित समाज कसे स्वत:चे नुकसान करून घेत आहे, हे दाखवणारा एकपात्री प्रयोग सरला कुलकर्णी यांनी सादर केला. तुमचे काम होईल, सोने दुप्पट होईल, बळी दिल्याने धन मिळेल, अशा गोष्टींना बळी पडून महिला कशा पद्धतीने स्वत:चे नुकसान करून घेतात हे यातून दाखवण्यात आले.