आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एन. डी. पटेलरोड होणार तीन टप्प्यांत;महापालिकेचे एक पाऊल मागे; मार्गावरील एकेरी वाहतूक राहणार सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील मुख्य मार्गांपैकी एक असलेल्या एन. डी. पटेलरोडचे नूतनीकरणाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून, या काळात एकेरी वाहतूक सुरू ठेवली जाणार असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्याचा मार्ग कायम राहणार आहे. महत्त्वाच्या सेवा बंद पडण्याचा धोकाही यामुळे टळला आहे.

एन. डी. पटेलरोडच्या नूतनीकरणाच्या कामासाठी चक्क तीन महिने मार्ग बंद ठेवण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक सरकारी कार्यालयांसह रहिवाशांमधूनदेखील संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मुळात एकेरी वाहतूक सुरू ठेवून रस्त्याचे काम पूर्ण करता येणे शक्य होते. शहरातील अन्य रस्तेही त्याचप्रमाणे केले जात असल्यामुळे एन. डी. पटेलरोडलाही तोच फॉर्म्युला वापरावा, अशी मागणी झाली होती. याबाबत ‘दिव्य मराठी’ने पाठपुरावा केल्यानंतर स्थानिक मनसे नगरसेविका माधुरी जाधव यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर तीन टप्प्यांत काम करण्याचे नियोजन झाले असून, त्यामुळे आता एकेरी वाहतूक सुरूच राहणार आहे.
गैरसोय होणार नाही
४नागरिकांना व महत्त्वाच्या सेवांना फटका बसणार नाही, याची दक्षता घेतली आहे. तीन टप्प्यांत काम होणार असून, जैन मंदिराकडून येणारा रस्ताही पर्यायी ठरेल. रस्त्याच्या कामादरम्यानही जातीने लक्ष ठेवले जाईल.
माधुरी जाधव, नगरसेविका, मनसे
तीन टप्प्यांत काम
४एन. डी. पटेलरोड पूर्ण बंद राहणार नसून, तीन टप्प्यांत काम होणार आहे. त्यातही रस्त्याच्या दोन बाजूंपैकी एका बाजूचे काम पूर्ण झाल्यावर दुसरी हाती घेतली जाईल. त्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही.
पी. बी. चव्हाण, उपअभियंता, महापालिका
असे आहे तीन टप्पे
किटकॅट कॉर्नर ते हॉटेल शिवप्रसाद
शिवप्रसाद ते गणपती मंदिर
गणपती मंदिर ते एसटी विभागीय कार्यालय
(फोटो- पटेल रोडचा फोटो)