आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्यांना कोट्यवधींचा गंडा घातल्याप्रकरणी ‘एन मार्ट’चा गोपाळ शेखावत अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘एन मार्ट’चा व्यवस्थापकीय संचालक गोपाल मोहनसिंग शेखावतला गुरुवारी क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. त्याला सात सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. बी. गवारे यांनी दिले.

‘एन मार्ट’मध्ये 5500 रुपये देऊन सभासद नोंदणी केली जात होती. सोबतच देशभरात मोठय़ा प्रमाणात मॉल उघडले होते. या माध्यमातून सभासदांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा शेखावत याच्यावर आरोप आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार सोनकांबळे आणि सुभाष पाटील यांच्या तक्रारीवरून 23 नोव्हेंबर 2012 रोजी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या आदेशाने औरंगाबादेत ‘एन. मार्ट’च्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सूरत आणि गुजरातमधील अन्य संचालकांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. यापैकी मुख्य आरोपी शेखावत फरार होता. त्याला आंध्र प्रदेशातील ओंगल जिल्हा प्रकाशम येथे अटक करून क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

शेखावत याच्याविरुद्ध आंध्र प्रदेशात 10 गुन्हे दाखल आहेत. तसेच 9 आरोपी अजूनही फरार आहेत. आरोपीने गुजरातमध्ये थाटलेल्या कार्यालयांतील दस्तऐवज तपासायचे असल्यामुळे दहा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील रूपाली मेतकेवार यांनी केली. यावर न्यायालयाने शेखावतला 7 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली.