आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामचे दत्तक धोंदलगाव आता विकासाच्या वाटेवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन या संस्थेने दत्तक घेतलेले वैजापूर तालुक्यातील धांदेलगाव विकासाच्या वाटेवर आहे. याशिवाय नाम फाउंडेशनच्या वतीने गावातील निळाबाई सिरसाठ व गंगाधर जाधव या वृद्धांना राहण्यासाठी घर बांधून दिल्याने या वृद्धांना मोठा दिलासा मिळाल्याचे पाहावयास मिळत आहे.
या धोंदलगावास सुजलाम सुफलाम करण्यासाठी या गावातील शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयोवृंद्धापर्यंत सर्वजण प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. साडेपाच हजार लोकसंख्या असणाऱ्या धोंदलगावास नाम फाउंडेशनने ऑक्टोबर महिन्यात दत्तक घेतले हाेते. या गावात लोकसहभागातून धोंदलगंगा नदीच्या खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे गावातील सुरू असलेेले पाण्याचे टँकर बंद झाले होते. औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद असोलकर यांनी धोंदलगाव विकासाचे मॉडेल बनू शकते हे नाम फाउंडेशनच्या निदर्शनास आणून दिल्याने नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या टीमने धोंदलगंगा नदीची व गावाची पाहणी करून गाव दत्तक घेण्याचे ठरवले होते. धोंदलगावात अातापर्यंत जलसंधारणाची चार कामे पूर्णत्वास गेलेली असून जलसंधारण बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर आहे. एका बंधाऱ्यात अंदाजे १ कोटी ९५ लाख ९१ हजार लिटर पाणी साठवले जाऊ शकते. तसेच धोंदलगंगा नदीमधील दोन बंधाऱ्यांपैकी नाम फाउंडेशनने एक व लोकसहभागातून एक बंधारा उभारण्यात आला आहे.
गावासह शिवार विकास
^
भविष्यात आणखी ५० गरजूंना नाम फाउंडेशनच्या मदतीने घरे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गावासह शिवाराचाही विकास करण्यासाठी जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तसेच संपूर्ण गावास एकच रंग देऊन गावाची एक वेगळी ओळख निर्माण करणार आहोत. ग्रामपंचायतीची नवी इमारत उभारण्यास लवकर प्रारंभ होणार आहे.
अण्णा डमाळे, सरपंच, धांेदलगाव
बातम्या आणखी आहेत...