नगर- महापालिकेचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय शहरातील मातांसाठी वरदान ठरले आहे. विनामूल्य विश्वसनीय सेवेसाठी नावारूपास आलेल्या या रुग्णालयात दरमहा तीनशे ते साडेतीनशे माता प्रसूत होतात.
ही संख्या वाढत असली, तरी डॉक्टर, नर्स आयांची संख्या "जैसे थे' आहे. त्यामुळे प्रसूत होणाऱ्या हजारो माता त्यांच्या बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयासाठी भव्य इमारत अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी एल अॅण्ड टीसारख्या कंपन्या पुढे येत आहेत. परंतु महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे रुग्णालयाची प्रगती खुंटली आहे.
महिन्याला किमान तीनशे ते साडेतीनशे महिलांची प्रसूती ४० ते ५० सिझेरियनच्या शस्त्रक्रिया येथे होतात. सर्वांत जुने, विश्वसनीय विनामूल्य सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या या रुग्णालयात रुग्णांसह डॉक्टर, नर्स, तसेच आयांची मात्र मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. प्रसूतींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना डॉक्टर कर्मचाऱ्यांची संख्या "जैसे थे' आहे. महापालिका प्रशासन पदाधिकारी रुग्णालयातील सोयीसुविधांबाबत केवळ बघ्याचीच भूमिका घेत आहेत.
नगरपालिकेची महापालिका होऊन बारा वर्षे उलटली, परंतु देशपांडे रुग्णालयातील समस्या कमी होण्याऐवजी अधिक वाढल्या आहेत. विनामूल्य विश्वसनीय सेवेमुळे रुग्णालयाचे नाव जिल्हाभर पोहाेचले.
विशेष म्हणजे रुग्णालयात सिझेरियनचे प्रमाण अत्यल्प आहे. खासगी रुग्णालयात सिझेरियनचे पेव फुटले असताना देशपांडे रुग्णालयातील नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण अजूनही कायम आहे. मात्र, आवश्यक यंत्रसामग्री मनुष्यबळाअभावी रुग्णांना सेवा देताना येथील डॉक्टर, नर्स आयांच्या नाकीनऊ येत आहेत. पुरेसे डॉक्टर कर्मचाऱ्यांची प्रशासनासह पदाधिकाऱ्यांकडे अनेकदा मागणी करूनही रुग्णालयातील मनुष्यबळ वाढलेले नाही. रुग्णाला भूल देण्यासाठीदेखील येथील डॉक्टरांना बाहेरच्या भूलतज्ज्ञांवर अवलंबून राहावे लागते.
ऐनवेळी भूलतज्ज्ञ उपलब्ध झाल्यास प्रसूत होणाऱ्या मातेची शस्त्रक्रिया थांबवावी लागते. रुग्णालयातील जनरल वॉर्ड प्रायव्हेट रूममध्ये ७० ते ८० महिला दररोज उपचार घेतात. त्यांच्या देखरेखीसाठी अवघ्या १४ नर्स आहेत. ‘आयां’ची देखील तीच स्थिती आहे. रुग्णांच्या सेवेसाठी केवळ ३५ आया आहेत.
या नर्स अाया दररोज तीन शिफ्टमध्ये काम करून ७० ते ८० माता त्यांच्या बाळांंची काळजी घेतात. प्रसूती, सीझर, बाळाजी काळजी, देखरेख, औषधांची माहिती, बाळाच्या जन्माचे रेकॉर्ड अशी एक ना अनेक कामे या नर्स आयांना करावी लागतात. एवढ्या धावपळीत एखादी माता तिच्या बाळाकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांना नातेवाईकांची बोलणी ऐकावी लागतात. त्यामुळे काम करावे तरी कसे? असा प्रश्न डॉक्टर, नर्स, आया इतर कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
मुलांचा अतिदक्षता विभागही नाही
अनेकदाकमी वजनाच्या बाळांचा जन्म होतो. त्यांना इन्क्युबेटर किंवा दक्षता विभागात ठेवण्याची गरज असते. ही व्यवस्था नसल्याने बाळांना खासगी रुग्णालयांत ठेवावे लागते. त्यामुळे आई देशपांडे रुग्णालयात बाळ दुसरीकडे असे होते. त्यामुळे येथे बाळांसाठी अतिदक्षता विभाग तातडीने उभारण्याची गरज असल्याचे एका डॉक्टरने सांगितले.
अायांची नवीन भरती नाही
अनेकआया निवृत्त झाल्या आहेत. मनपाने दहा-बारा वर्षांपासून नवीन आयांची भरतीच केलेली नाही. त्यामुळे आहे त्या आयांना कामाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासन पदाधिकारी केवळ रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा देऊ, नूतनीकरण करू, इमारत बांधू, कर्मचाऱ्यांची भरती करू अशी आश्वासने वर्षानुवर्षांपासून देत आहेत. प्रत्यक्षात मात्र काहीच कार्यवाही होत नाही.
अशी आहे रुग्णसेवा
- ०१ आॅपरेशन थिएटर
- ०१ डिलिव्हरी रूम
- ११ प्रायव्हेट रूम
- ४२ कॉटचा जनरल वॉर्ड
असे आहेत कर्मचारी
- स्त्रीरोगतज्ज्ञ०२ ( गरज ०४)
- पूर्णवेळ डॉक्टर ०२ (गरज ०५)
- अर्धवेळ डॉक्टर ०४ (गरज ०७)
- नर्स १४ (गरज २०)
- आया ३५ (गरज ६०)
- स्वच्छता कर्मचारी ०३ (गरज ०८)