आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यातील वाँटेडला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नगर जिल्ह्यात अनेक दरोडे आणि लूटमार करून फरार असलेल्या म्होरक्याला औरंगाबाद पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि स्कोडा कार जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री जालना रोडवरील कलिंगा हॉटेलमध्ये सापळा रचून त्याला अटक करण्यात सिडको पोलिसांना यश आले असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी पत्रकाराशी बोलताना दिली.
अटक करण्यात आलेला गोरक्षनाथ नाना येवले ऊर्फ टँगो (२९) हा नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवासी आहे. कारमध्ये ठेवलेली रोख लांबवणे, रस्ता अडवून लुटणे, हल्ला करून रोकड आणि कार पळवणे आदी स्वरूपाचे गुन्हे करण्यात येवले गँग पटाईत आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर, राहाता याशिवाय मुंबई आणि सातारा परिसरात त्याने दरोडे आणि लूटमार केल्याचे समोर आले आहे. येवलेच्या टोळीचे बापू गायकवाड (रा. देवळाली प्रवरा), गोट्या चिकने (रा.राहाता), सुजित सदाफळ (रा.राहाता), अामेर खान अकबर खान (रा.सोनगीरवाडी, ता.वाई, जिल्हा सातारा) यांच्याविरुद्ध नगर जिल्ह्यतील विविध पोलिस ठाण्यांत दरोडे आणि लूटमार केल्याचे गुन्हे आहेत. टोळीचे सदस्य अटकेत आहेत. मात्र येवले पोलिसांच्या हाती लागत नव्हता. येवलेला अटक केल्यानंतर नगर, सातारा आणि मुंबई परिसरात या टोळीने सात दरोडे आणि लूटमारीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. एकूण २० लाख ४९ हजार ६२९ रुपयांचा हिशेब औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागला आहे. रात्री पोलिसांनी गावठी कट्टा आणि स्कोडा आॅक्टाव्हिया (एमएच ०४ सीजे ४६३९) पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार एका डॉक्टरकडून विकत घेतल्याचे तो सांगतो. ही कार विकण्यासाठी येवले शहरात आला होता. औरंगाबादच्या एकाला भोसकून लुटले

येवलेने अनेक गुन्हे केले. त्यात औरंगाबाद येथील पडेगाव चिनार गार्डन येथील गुलमोहर कॉलनीतील एका रहिवाशाला पारनेर तालुक्यातील बेळवंडी फाटा येथे इंडिका कार अडवून पिस्तुलाचा धाक दाखवत पोटात चाकूने वार करून रोख १९ हजार रुपये आणि इंडिका कार (एमएच २० बीआर ८०८५) घेऊन येवले फरार झाला होता.
कटरने कार फोडून चोरी
लॉक केलेल्या कारची काच कटरने तोडून तो पैसे लांबवायचा. त्याने टाकलेले दरोडे किंवा लूटमार ही पाच लाखांच्या पुढची असायची. त्याचे वडील देवळाली प्रवरा येथे किराणा दुकान चालवतात.
यांनी केली कारवाई

पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त गणेश राठोड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनकर जरारे, संपत राठोड, सुखदेव जाधव, समाधान काळे, दीपक शिंदे, शिरीष वाघ, राजेंद्र घुनावत,अरुण उगले, भीमराव पवार यांनी कारवाई केली.