आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagare Take Charge Of Director Of Police Aurangabad

नागरे यांनी स्वीकारला महानिरीक्षकपदाचा पदभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद परिक्षेत्राच्या महानिरीक्षक पदावरून अमितेशकुमार यांची शहर पोलिस आयुक्तपदी बदली झाल्यानंतर मंगळवारी विश्वास नागरे पाटील यांनी औरंगाबाद परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. पोलिस खाते हे एक प्रकारे माझे कुटुंब असल्यामुळे त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला त्यांच्या अडचणींची जाण असल्यामुळे त्यांच्या अडचणी दूर करण्याचे काम करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नागरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबरोबर नांदेडचादेखील पदभार माझ्याकडे सोपविण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सक्षम असले तरी अवैध धंद्यांना आळा बसलेला दिसला नाही. त्यांना निश्चितपणे कारवाई करण्यास भाग पाडणार असून वाळू माफियांचा अभ्यास करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जातील, असेही नागरे यांनी स्पष्ट केले.