आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात नगरपालिका कर्मचारी रजेवर; दिवसभर काम ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- नगरविकास विभागाकडे विविध प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्यात प्रमुख मागणीसाठी येथील पालिका कर्मचाऱ्यांनी बुधवारी सामूहिक रजा आंदोलन केले. दरम्यान, पालिकेतील सर्व विभागातील प्रमुख व कर्मचाऱ्यांनी रजा आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे कार्यालयीन कामकाज दिवसभर ठप्प  झाले होते. सरकारने मागण्या मान्य न केल्यास २१ ऑगस्टपासून पालिका कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशारा कर्मचारी संघटनेने  निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांमार्फत प्रशासनाला दिला आहे. 

कर्मचारी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन, सफाई कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व नगरपालिकांमध्ये ९ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. या वेळी बाबुराव पुणे, सुरेश दानापुरे, मोती हिवाळे, बाळासाहेब चव्हाण, प्रकाश पाटील, जयपाल राजपूत उपस्थित होते.

खुलताबाद: नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या एकदिवसीय कामबंद अांदोलनामुळे खुलताबाद शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासह साफसफाई केलेली नसल्याने अस्वच्छतेचा सामना करावा लागला. प्रलंबित मागण्या मंजूर न केल्यास  येत्या २१ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनात अप्पाराव देवकर, शेषराव फुलारे, सुखदेव घुसळे, प्रकाश दाभाडे, एस. एस. गायकवाड, बी. ए. तंबारे,  मुक्तारभाई, इरफानोद्दीन, शरद भालेराव सहभागी झाले होते.

सिल्लोड:  नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने सिल्लोड नगर परिषदेचे कर्मचारी, सफाई कामगारांनी सामूहिक रजा घेऊन आंदोलन केले. मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग व रोजंदारी कर्मचारी व अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने बुधवारी सामूहिक रजा आंदोलन केले. आंदोलनात उपमुख्याधिकारी ए. बी. पठाण, कार्यालय अधीक्षक सुनील गोराडे, ईश्वर शिमरे, शेख निसारोद्दीन, रमाकांत बाच्छे, गोर, धाडगे, अन्वर पठाण, विठ्ठल दोरखे, राहुल साळवे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...