आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगमा युरोपियन कमिशनमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व, औरंगाबादसाठी अभिमानाची बाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगमा नाज शेख - Divya Marathi
नगमा नाज शेख
औरंगाबाद- युरोपियन कमिशनच्या इरॉसमस प्लस कार्यक्रमाअंतर्गत फिलिपाइन्समध्ये आॅगस्टमध्ये आयोजित कार्यशाळेत औरंगाबादची नगमा नाज शेख ही युवती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दिवसांच्या कार्यशाळेत नगमा भारतातील युवकांच्या समस्या, त्या सोडवण्यासाठी शासकीय आणि अशासकीय स्तरावर होत असलेले प्रयत्न, युवकांसाठीच्या कल्याणकारी योजना आदींवर भाष्य करणार आहे.

या कार्यशाळेसाठी जाण्याचा मान मिळालेली नगमा महाराष्ट्रातील पहिलीच युवती ठरली अाहे. 
युरोपियन कमिशनच्या इरॉसमस प्लस कार्यक्रमाअंतर्गत तरुणांमधील कौशल्यवृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकास करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतात यासाठी औरंगाबादच्या दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट ही स्वंयसेवी संस्था गेल्या वर्षांपासून कार्यरत आहे. वर्षातून एकदा सर्व सदस्यांची कार्यशाळा एका युरोपियन देशात होते. यंदा ही कार्यशाळा फिलिपाइन्समध्ये २१ ते २८ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यासाठी इरॉसमस प्लसने खंडांतील १३ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांना निमंत्रित केले होते. यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी औरंगाबादची युवती नगमा नाज शेख हिला मिळाल्याची माहिती दिशाचे सरचिटणीस किरॉन वैष्णव यांनी दिली. 

संरक्षण शास्त्राची पदवीधर 
नगमा नाज शेख ही मूळ औरंगाबादची असून तिचे आई-वडील आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. नगमाचे महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबादेत झाले. तिने पुणे विद्यापीठातून संरक्षण सामरिकशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय कायदा मानवी हक्क या पदविकेत ती महाविद्यालयात द्वितीय ठरली होती. शिक्षण सुरू असतानाच तिने रेड क्रॉस सोसायटी आणि यशदासह अनेक सामाजिक उपक्रमांत सहभाग नोंदवला होता. ‘दिव्य मराठी’ने इरॉसमस प्लसमध्ये तरुणांना इंटर्नशिपची संधी असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. ते वाचून नगमाने गेल्या वर्षीच या कार्यशाळेसाठी प्रयत्न सुरू केले. गेले महिने ती दिशा इंटरनॅशनलसोबत काम करत आहे. किरॉन वैष्णव यांनी तिचा बायोडाटा कार्यशाळेचे समन्वयक इटली येथील युनेट या स्वयंसेवी संस्थेकडे पाठवला. यानंतर तिचा एकदा स्काइपवर इंटरव्ह्यू झाला. 

गेल्या महिन्यात इंग्लंडहून आलेल्या इरॉसमस प्लसच्या बेव्हरली एव्हर शेड यांनी औरंगाबादेत तिचा इंटरव्ह्यू घेतला. यात यशस्वी झाल्यावर गेल्या आठवड्यात नगमाला निवड झाल्याचे पत्र मिळाले. बिल्डिंग एम्पॉवरिंग एन्व्हायर्नमेंट फॉर यूथ एम्प्लॉयिबिलिटी म्हणजेच बी या उपक्रमाच्या कार्यशाळेत नगमा भारतातील तरुणांचे प्रतिनिधित्व करेल. या दौऱ्याचे नियोजन आणि खर्च दिशा इंटरनॅशनल ट्रस्टतर्फे केला जाणार असल्याचे किरॉन वैष्णव यांनी सांगितले. 

खडतर चाचण्यांतूननगमा शेख हिची कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. ही औरंगाबाद आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. नगमा औरंगाबादचे नाव उंचावेल याची खात्री वाटते. -किरॉन - वैष्णव, सरचिटणीस, दिशा इंटरनॅशनल ट्रस्ट फाउंडेशन 
बातम्या आणखी आहेत...