आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpanchami Festival,Latest News In Divya Marathi

नागपंचमीच्या सणासाठी बाजार सजला, माहेरवाशीणी उत्सवा आतूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- श्रावणसरींसोबत आनंद देणारा नागपचंमी सण साजरा करण्यासाठी मुली, सुना-माहेरवाशीणी उत्सुक झाल्या आहेत. बाजारपेठ नव्या साड्या, दागिने, बांगड्या, मेंदी व विविध सौंदर्यप्रसाधनाने सजली आहेत. उंच झोके घेण्यासाठी मोठय़ा झोक्यांच्या बांधणीची लगबगही सुरू झाली आहे.
प्रेम दुल्हन मेंदीची मागणी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. किमान पाच रुपयाला असलेली ही मेंदी अतिशय गडद रंगाची असल्याने युवतींचा कल त्याच्याकडे झुकताना दिसतो.
महिलांच्या आवडीत झपाट्याने बदल होतात. दागिन्यांची फॅशन सहा महिन्यांत बदलते. नागपंचमी सणासाठी नवीन दागिन्यांचे स्टॉक आले आहेत, अशी माहिती व्यापारी मोहन अग्रवाल यांनी दिली.
मेकअप किट्सही बाजारात : विविध कंपनीचे पॅन केक, कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टीक, रू झ, आय लायनर, आय शॅडो असे संयुक्त किट बाजारात आले आहेत. विविध प्रकारच्या कंपनीचे साहित्य हे एका किटमध्ये मिळणार आहे. यात किमान एक हजार ते 6 हजारापर्यंत किट उपलब्ध आहेत.
वर्कच्या साड्यांचे राज्य : जरीकाठाच्या साड्यांपेक्षा मीनाक्षी वर्क, कुन्दन वर्क, टिकली वर्क अशा विविध प्रकारच्या वर्कच्या साड्या बाजारात आल्या आहेत. जुन्या फॅशनमध्ये नव्या रंगांची आणि नक्षीची मिश्रणे करून विविध प्रकारच्या नव्या साड्यांचे अनेक प्रकार यंदा महिलांना पाहावयास मिळणार आहे.
कॉपर ज्वेलरीची मोठी आवक : कुन्दन, डायमंड, बेंटेक्स, स्टील आयर्न, प्लास्टिक यांच्या विविध प्रकारच्या दागिन्यांपेक्षा यंदाच्या नागपंचमीसाठी कॉपर (तांब्याच्या ) आकर्षक दागिन्यांचे भरपूर स्टॉक आले आहेत.
डायमंडची चलती : खास नागपचंमीनिमित्त बाजारात पांढर्‍या रंगाचे दागिने दाखल झाले आहेत. अंगठी, हार, बांगड्या, पिना, साडी पिन, हेअर पिन अशा विविध प्रकारच्या आकर्षक दागिन्यांच्या सेटचे प्रकारही मोठय़ा प्रमाणावर आले आहेत. याच्या किमती 500 ते 5000 पर्यंत आहेत.