आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर-मुंबई सुपरफास्ट हायवेचे काम तीन महिन्यांत सुरू होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - नागपूर-मुंबईसुपरफास्ट हायवेच्या कामाला तीन महिन्यांत सुरुवात करण्यात येणार असून या हायवेमुळे नागपूर-मुंबई हा प्रवास तासांत पूर्ण करता येईल, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे गुरुवारी झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. प्रस्तावित नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे (महारष्ट्र समृद्धी महामार्ग) प्रकल्प आराखडा तसेच या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या संधी या विषयावर गुरुवारी उद्योजक औद्योगिक संघटनेसोबत परिसंवाद झाला. या वेळी विभागीय आयुक्त दांगट यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य रस्ते विकास महामंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या वेळी मोपलवार म्हणाले, या महामार्गावर वायफाय सेवेसह सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. दर ३० ते ४० किलोमीटर अंतरावर रेस्टाॅरंट, पेट्रोल, स्वच्छतागृहे असतील. सुमारे ७०० किलोमीटरचा हा महामार्ग १० जिल्हे, २७ तालुके ३४७ गावांना जोडणारा ठरेल. या महामार्गामुळे नागपूर-मुंबई हे अंतर अंदाजे तासांत पूर्ण होणार असून या मार्गावर ट्रक ताशी १०० किमी तर, अवजड वाहनाव्यतिरिक्त अन्य वाहने ताशी १५० किमी वेगाने धावतील. या वेळी उद्योजक राहुल मोगले, भारत मोतिंगे, अनिल पाटील उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...