आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नहरी’वरील बांधकाम थांबवले; चार दिवसांत मागविला सर्वेक्षण अहवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या नहर-ए-अंबरीची तोडफोड करून त्यावर हिमायतबागेतील फळ संशोधन केंद्रातर्फे संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू होते. दै. ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच याची गंभीर दखल घेऊन तातडीने बांधकाम थांबवण्यात आले.

वारसा संरक्षण समितीने मंगळवारी (22 जानेवारी) महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली होती. यात नहर-ए-अंबरीच्या संरक्षणासाठी चारसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीवर वारसा संरक्षण समितीच्या एका सदस्यासह नगररचना, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रत्येकी एक अधिकारी असेल. ही समिती चार दिवसात नहर-ए-अंबरीची पाहणी करून झालेले नुकसान तसेच त्याच्या संरक्षणाबद्दल अहवाल देणार आहे. नहरीची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यापर्यंत र्मयादित न राहता नहरीची तोडफोड करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इतिहासतज्ज्ञ करत आहेत.

सुमारे चारशे वर्षांपासून शहरात भूमिगत पाणीपुरवठा करणार्‍या नहर-ए-अंबरीची मुख्य वाहिनी मौलाना आझाद महाविद्यालयापासून हिमायत बाग येथील फळ संशाधन केंद्राच्या जागेतून दिल्ली गेटकडे जाते. मात्र, फळ संशोधन केंद्राची संरक्षक भिंत बांधण्यासाठी या ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे नहरीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नहरीचे माती आणि चुन्याने बनवलेले नळ फोडून त्याजागी बांधकाम करण्यात येत आहे. यासंबंधी ‘दिव्य मराठी’ने ‘नहर-ए-अंबरीवर मुजोरी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन वारसा संरक्षण समितीने बांधकाम थांबवले. मनपा आयुक्तांच्या दालनात बोलावण्यात आलेल्या बैठकीला समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे, महाराष्ट्र पर्यटन विक ास महामंडळाचे शेखर जैस्वाल, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी एस. एस. घुगे, कृषी अभियंता एस. जे. सुपेकर, दुलारी कु रैशी आदींची उपस्थिती होती.

...तर दोषींवर कारवाई करू
>नहर-ए-अंबरीच्या संरक्षणासाठी सर्वेक्षण समिती नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, आवश्यक असेल तर दोषींवर कारवाई करू.
जयंत देशपांडे, अध्यक्ष, वारसा संरक्षण समिती
>भिंतीचे काम थांबवले आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊन नहरीच्या नकाशाप्रमाणेच पुढील काम करण्यात येईल.
एस. एस. घुगे, प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र.
>या नहरीतून आजही पाणीपुरवठा होतो. केवळ बांधकाम थांबवून चालणार नाही तर अशा ऐतिहासिक आणि मौल्यवान नहरीस उद्ध्वस्त करणाºयांना शिक्षा व दंड झालाच पाहिजे.
डॉ. शेख रमझान, इतिहासतज्ज्ञ