आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nahar e Ambari Survey : Encrochment Circle, Surplus Water Pumping

नहर-ए-अंबरीच्या सर्वेक्षण : अतिक्रमणांचा विळखा, पाण्याचा वारेमाप उपसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नहर-ए-अंबरीच्या सर्वेक्षणाला बुधवारी (17 एप्रिल) सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ झाला. नहर संवर्धन समितीने गायमुखाच्या मेन होलपासून सर्वेक्षणाला सुरुवात केली. दुपारी दीड वाजेपर्यंत 60 मेन होलची पाहणी करण्यात आली. त्यातील 15 मेन होलमध्ये सहा इंच ते एक फुटापर्यंत पाणी आढळून आले. यंदा कमी पाऊस झाल्याने पाण्याचे झरे बुजून 80 टक्के मेन होल कोरडे पडले आहेत. नहरीच्या आतील भागाचे सर्वेक्षण झाल्यानंतरच पडझडीचे खरे कारण समोर येईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पावसाळा सुरू होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी आहे. या काळात कोणत्याही परिस्थितीत नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचे संवर्धन व्हावे, असा समितीचा मानस आहे. तत्पूर्वी या समितीला चार दिवसांत सर्वेक्षण करून विविध उपाययोजनांचा अहवाल 24 एप्रिल रोजी हायकोर्टाला सादर करायचा आहे. त्या दृष्टीने महापालिकेचे शहर अभियंता एम. डी. सोनवणे प्रशासकीय अधिकारी शेख कादर, एमटीडीसीचे अभियंता ई. झेड. पंचभाई, नगररचना विभागाचे उपअभियंता फहीम सिद्दिकी, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपभियंता आर. एन. संधा, डी. पी. डिझाइन असोसिएट्सचे प्रदीप देशपांडे, नहरीचे अभ्यासक डॉ. शेख रमझान, वक्फ बोर्डाचे अभियंता महंमद माहारूफ यांनी नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीच्या संवर्धनासाठी सुरुवात केली आहे. हायकोर्टात अहवाल सादर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने नहरीच्या संवर्धनासाठी काम सुरू होणार आहे.

400 वर्षांत प्रथमच सर्वेक्षण, नहरीत अवाढव्य दगड : नहरीची लांबी साडेतीन किलोमीटर आहे. बोगद्यात अंधार आहे. 400 वर्षांपासून याचे सर्वेक्षण झालेले नाही. यामुळे बोगद्यात मोठय़ा प्रमाणावर अस्वच्छता आहे. नहरीत सरपटणारे घातक प्राणी, दगड, गाळ, कचरा, दुर्गंधी मोठय़ा प्रमाणात आहे. अंधारात याची स्वच्छता करणे शक्य होणार नाही. त्यामुळे बॅटरी, ऑक्सिजनची व्यवस्था, गाळ, कचरा, दगड काढण्यासाठी अद्ययावत यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नहरीत 25 ते 30 किलो वजनाचे दगड पडले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था, सुरक्षेसाठी विविध हत्यारे, काठय़ा, वृक्षांच्या मुळ्या कापण्यासाठी कटर आदींची व्यवस्था करावी लागणार आहे.

सध्या नहरीच्या बाह्य भागाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. येथे शंभर मेन होल असून शेवटच्या टोकापासून सर्वेक्षण सुरू झाले सध्या नहरीच्या बाह्य भागाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. येथे शंभर मेन होल असून शेवटच्या टोकापासून सर्वेक्षण सुरू झाले
पहिल्या दिवशी 60 मेन होलचे सर्वेक्षण करण्यात आले. मेन होलचे बांधकाम जमिनीपासून वर 7 फूट, तर जमिनीखाली 15 ते 18 फूट खोल आहे. मेन होलची लांबी आणि रुंदी 5 बाय 6 आहे.

नहरीची रुंदी अडीच फूट, तर उंची चार ते आठ फुटांपर्यंत आहे. 20 मेन होलमध्ये 6 इंच ते 1 फूट पाणी असल्याचे निदर्शनास आले. 15 मेन होल अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातून पाणी उपसाही केला जातो.

नहरीतील पाण्याचा प्रवाह थांबला आहे. पाणी ठिकठिकाणी साचल्याचे आढळले. नहरीची तोडफोड करून विद्युत मोटार पंप लावले आहेत.

15 एप्रिल रोजी सोनवणे यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने मोटार पंप काढून घेण्यात आले आहेत. वीटभट्टी मालकांचा यामध्ये मोठा वाटा आहे.

मातीचे ढिगारे, कचरा, दगडांचा खच पडला आहे. हे सर्वेक्षण मेन होलचे बाह्य आणि अंतर्गत उंची मोजण्यापुरते र्मयादित आहे.

नहरीचे अंतर्बाह्य सर्वेक्षण होणे आवश्यक आहे, तरच वास्तव समोर येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.